घरताज्या घडामोडीFight In Flight : कपडे फाडले, लाथाबुक्क्यांचा मार; विमानात प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी

Fight In Flight : कपडे फाडले, लाथाबुक्क्यांचा मार; विमानात प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी

Subscribe

दिल्ली-पाटणा विमानात प्रवाशांमध्ये राडा झाल्याची घटना ताजी असतानाच आता बांगलादेशातील एका विमानात दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेशातील नॅशनल एअरलाईन्सच्या उडत्या विमानात दोन प्रवाशांमध्ये हाणामारीची धक्कादायक घटना घडली.

दिल्ली-पाटणा विमानात प्रवाशांमध्ये राडा झाल्याची घटना ताजी असतानाच आता बांगलादेशातील एका विमानात दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेशातील नॅशनल एअरलाईन्सच्या उडत्या विमानात दोन प्रवाशांमध्ये हाणामारीची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर विमान ढाका विमानतळावर उतरल्यानंतर विमानतळ पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. (fight between passengers in flight bangladesh video viral)

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश एअरलाइन्सच्या बोईंग 777 विमान ढाक्यासाठी निघाले होते. या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर उडत्या विमानात काही प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर प्रवाशांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याने प्रकरण चिघळले. त्यानंतर संतापलेल्या एका तरुणानं दुसऱ्या प्रवाशाचे कपडे फाडून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

- Advertisement -

विमानामध्ये अचानक हाणामारी सुरू झाल्याने इतर प्रवाशांनी आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी प्रवासी कर्मचाऱ्यांसहीत कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर विमान ढाक्यामध्ये उतरवण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बितांतो बिस्वास या युजरने घटनेचा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, ही घटना नेमकी कधीची आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांमधील विमानात हाणामारीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता बांगलादेशातही उडत्या विमानात मारामारी झाल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कहून दिल्लीच्या दिशेनं येत असलेल्या विमानात एका प्रवाशानं महिलेच्या तोंडावर मूत्रविसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या विमानात मद्यधुंद प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता बांगलादेश एअरलाईन्सच्या विमानातही हाणामारीची घटना समोर आल्यामुळं विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


हेही वाचा – हनुमान चालिसा प्रकरण : दोषमुक्तीसाठी राणा दाम्पत्याकडून विशेष न्यायालयात अर्ज

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -