घरताज्या घडामोडीपाटणातील तेल गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल

पाटणातील तेल गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल

Subscribe

बिहारची राजधानी पाटणा येथील तेलाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज पहाटेच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल्या झाल्या आहेत. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मंगल तलावाजवळील परिसरात रिफाइंड तेलाचे गोदाम असून त्यामधून धुराचे लोट बाहेर येत आहेत.

- Advertisement -

ज्या ठिकाणी आग लागली ती जागा अरुंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पोहोचवण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. परंतु या घटनेत सुदैवाने कोणालाही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गोदामाच्या आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला आहे. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण सुरू आहे. तसेच ही आग पहाटे ५.१५ च्या सुमारास लागल्याचे सांगण्यात येत आहे. भीषण आगीमुळे धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले आहेत. परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

- Advertisement -

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.


हेही वाचा : ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -