घरठाणेबुलेट ट्रेनला जोडणाऱ्या पुलाला हायकोर्टाचा हिरवा कंदील; शिळफाटा ते कल्याण मार्गाची वाहतूककोंडी...

बुलेट ट्रेनला जोडणाऱ्या पुलाला हायकोर्टाचा हिरवा कंदील; शिळफाटा ते कल्याण मार्गाची वाहतूककोंडी सुटणार

Subscribe

अमर मोहिते

मुंबईः आगासन ते कल्याण येथील देसाई खाडीवर उड्डाणपूल बांधण्यास उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला परवानगी दिली आहे. हा पूल बुलेट ट्रेनला जोडणारा आहे. हा पूल झाल्यानंतर कल्याण ते शिळफाटा येथील वाहतूककोंडीही सुटणार आहे.

- Advertisement -

देसाई खाडीवर उड्डाणपूल बांधण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज ठाणे महानगरपालिकेने न्यायालयात केला होता. कल्याण शिळफाटा ते आगासन जोडण्यासाठी हा पूल ठाणे महापालिकेला बांधायचा आहे. हा पूल झाल्यास दिवा, दातीवली, उसारगर, मार्थाडी, देसाई, खिडकाळी, पाडले,तालेपाडी, पलावा येथील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. हा पूल बुलेट ट्रेनला जोडणार आहे. हा पूल झाल्यास कल्याण ते शिळफाटा वाहतूक कोंडी २५ टक्के कमी होणार आहे. तसेच ६० टक्के वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. ५४०० चौ.मी. पूलाचे बांधकाम होणार आहे. हा पूल सीआरझेडमध्ये मोडतो. या परिसरात ८ तिवरांची झाडे आहेत. मात्र ती पूलापासून लांब आहेत. ती कापण्याची आवश्यकता नाही, असे सहाय्यक वन संवर्धनच्या तिवर विभागाने सांगितले. त्यामुळे सीआरझेड व संबंधित विभागाने हा पूल बांधण्यास परवानगी दिली आहे. हा जनहिताचा प्रकल्प आहे. ५० मीटर तिवरांच्या परिसरात या पुलाच्या बांधकामास न्यायालयाने परवानगी द्यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती.

हंगामी मुख्य न्यायाधीश एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. संदीत मारने यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. हा पूल झाल्यास वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. सीआरझेडने यासाठी परवानगी दिली आहे. व्यापक जनहिताचा हा प्रकल्प आहे. परिणामी या पुलाच्या बांधकामास परवानगी दिली जात आहे. मात्र ठाणे पालिकेने नियमांचे पालन करुनच पुलाचे बांधकाम करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तिवरांची झाडे असलेल्या परिसरात बांधकाम करायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसे आदेशच न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेने हा अर्ज केला होता.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -