घरताज्या घडामोडीदिल्लीत आंदोलनादरम्यान 'वंदे मातरम'च्या घोषणा करत तरुणाचा गोळीबार

दिल्लीत आंदोलनादरम्यान ‘वंदे मातरम’च्या घोषणा करत तरुणाचा गोळीबार

Subscribe

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात नवी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. याचदरम्यान गुरुवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठापासून राजघाटापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत अज्ञाताने गोळीबार केला. यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. हल्लेखोराचे नाव गोपाळ आहे. तर जखमी विद्यार्थ्याचे नाव शादाब असे आहे. शादाब जामिया इस्लामिया विद्यापीठात मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.

सीएए आणि एनआरसीवरून सध्या देशभरात तणावाचे वातावरण आहे. नवी दिल्लीत विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पण पोलिसांच्या या सुरक्षा व्यवस्थेला छेद देत एक बंदुकधारी तरुण गर्दीत घुसला. भारत माता की जय, वंदे मातरम, दिल्ली पोलीस जिंदाबाद अशा घोषणा करत त्याने आंदोलकांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक वाट दिसेल तिथे पळू लागले. यावेळी तरुणाच्या गोळीबारात शादाब जखमी झाला. पण तरुण गोळीबार करत असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्यानंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -