घरदेश-विदेशव्हायरल 'मोमो'ने भारतात घेतला पहिला बळी?

व्हायरल ‘मोमो’ने भारतात घेतला पहिला बळी?

Subscribe

'ब्लू व्हेल' या जीवघेण्या गेमनंतर सध्या तशाचप्रकारचा हा भयानक 'मोमो' गेम जगभरात व्हायरल होतो आहे. दरम्यान भारतामध्ये 'मोमो' गेमचा पहिला बळी गेला असल्याचा दावा केला जात आहे.

सध्या जगभरात एक भयानक गेम सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या गेमचं नाव आहे ‘मोमो’.  ‘मोमो व्हॉटस् अ‍ॅप चॅलेंज’ असं एक चॅलेंज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या धक्कायदायक माहितीनुसार हे ‘मोमो’ व्हॉटस् अ‍ॅप चॅलेंज तरुणांना आत्महत्या करायला प्रवृत्त करत आहे. दरम्यान भारतात या भयानक गेमचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या अजमेरमधील एका १० वर्षीय मुलीने या गेममुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत मुलाच्या पालकांनी मोमो गेममुळे आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवली आहे. तसंच याबबात अधिक चौकशी करण्याची करण्याची विनंतीही केली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, आत्महत्या करणारी मुलगी सातत्याने ‘मोमो’ गेम खेळत असल्याची माहिती तिच्या एका मित्राने/मैत्रिणीने मृत मुलीच्या भावाला दिली होती. तसंच मृत मुलीच्या भावानेही ‘नॅशनल डेली’शी बोलताना सांगितलं की, आपली बहिण फावल्या वेळात आणि शाळेच्या लंच टाईममध्ये हा मोमो गेम खेळायची. दरम्यान प्राथमिक तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या १० वर्षीय लहान मुलीने गळफास लावण्याआधी आपल्या हाताची नस देखील कापली होती.

 

- Advertisement -
momo death
सौजन्य- metro.co.uk

आत्महत्येचं नक्की कारण काय?

दरम्यान पोलीसांना तपासादरम्यान मृत मुलीची सुसाईड नोट मिळाली असून, त्यामधून एक वेगळाच खुलासा झाला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना सुसाईड नोटमध्ये मार्क कमी मिळाल्यामुळे आपण आत्महत्या केली असल्याचं लिहीलं आहे. ‘परीक्षेमध्ये खूप कमी मार्क मिळाल्यामुळे आपण हे टोकाचं पाऊल उचलत आहोत’, असं तिने नोटमध्ये लिहीलं असल्याचं पोलीस सांगत आहेत. दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, ‘इतक्या लहान वयात त्या मुलीला असलेली इंटरनेट वापराची सवय तसंच तिच्या निकटवर्तीयांनी ती सातत्याने MOMO गेम खेळत असल्याची दिलेली माहिती, यावरुन त्या मुलीच्या आत्महत्येचा आणि मोमो गेमचा खरंच काही संबंध आहे का? याचाही तपास केला जाईल.’ तपास पूर्ण झाल्यावरच आपल्याला आत्महत्येमागचं नेमकं कारण समजू शकेल असंही त्यांनी सांगितलं.

काय आहे MOMO गेम ?

उपलब्ध माहितीनुसार, सुरुवातीला तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एक नंबर येतो. हा नंबर ‘मोमो’ या नावाने सेव्ह केलेला असतो आणि त्यावर एका विचित्र चेहऱ्याच्या बाईचा फोटो असतो. इतकंच नाही तर त्याखाली ‘कॉन्टॅक्ट मी’ असा मेसेजही लिहीलेला असतो. अनेक लोक उत्सुकतेपोटी हा नंबर सेव्ह करतात आणि तिथूनच या खेळाला सुरुवात होते. आतापर्यंत समोर आलेल्या अहवालानुसार बऱ्याच लोकांनी या मोमोचा नंबर सेव्ह करुन तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञ सांगतात की, या नंबरवरुन तुम्ही ज्या व्यक्तीशी संपर्क साधता, ती व्यक्ती सुरुवातीला तुमच्या मनामध्ये भीती भरवते. आयुष्यातील अडचणी, संकटं यांची भीती दाखवत कॉल करणाऱ्याला घाबरवून टाकते, निराश करते. त्यानंतर एकप्रकारे हिप्नोटाईज करुन कॉलरला आत्महत्येकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो.

- Advertisement -

Momo whatsapp game

‘मोमो’मध्ये दिसणारी ती विचित्र चेहऱ्याची बाई, जपानच्या एका वस्तू संग्रहालयातील बाहुलीसारखी दिसते. प्रसिद्ध जपानी कलाकार मिदोरी हयाशी यांनी  ती चित्रविचीत्र बाहुली बनवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -