घरमुंबईवाहतूक कोंडीमुळे शाळेतील मुलांना पाठदुखीचा त्रास 

वाहतूक कोंडीमुळे शाळेतील मुलांना पाठदुखीचा त्रास 

Subscribe

रस्त्यांवरील  खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी वाढत असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून शाळेतील मुलांना सुद्धा पाठदुखीचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

“वाहतूक कोंडी” ही सध्या शहरातील नागरिकांना भेडसावत असलेली सर्वात मोठी समस्या आहे.  गेल्या २ महिन्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई – नवी मुंबई ठाणे शहरामध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हे खड्डे बुजवण्यास अजून तरी दोन महिन्याचा अवधी लागणार आहे. रस्त्यांवरील  खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी वाढत असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून शाळेतील मुलांना सुद्धा पाठदुखीचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दप्तराचे ओझे वाहतूक कोंडीमुळे ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ पाठीवर लादल्यामुळे त्यांच्या पाठदुखीमध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलने समोर आणली आहे.

वाहतूक कोंडीमुळे वजनाचा होतो त्रास

नवी मुंबई शहरात सध्या दोनशेहून अधिक शाळा कॉलेज असून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील अनेक विद्यार्थी हे शाळेतील बस अथवा खाजगी वाहनाने प्रवास करतात. पण, वाहतूक कोंडीमुळे या मुलांना तासन् तास पाठीवर  दप्तराचे ओझे घेऊन प्रवास करावा लागत आहे.

- Advertisement -

दप्तराचे वजन मुलाच्या वजनाच्या दहा टक्के असावं

याविषयी माहिती देताना स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे अस्थिव्यंग तज्ज्ञ आणि शल्य विशारद डॉ. उर्केश शहा यांनी सांगितलं, ” प्रत्येक वयात वजन उचलण्याची विशिष्ट क्षमता असते. दप्तराचे वजन जास्तीत जास्त मुलाच्या वजनाच्या दहा टक्के असावे. म्हणजेच, विद्यार्थ्याचे वजन १५ किलो असेल, तर दप्तराचे वजन दीड किलोहून अधिक असू नये. प्री नर्सरी आणि नर्सरीला बॅग लेस, पहिली ते दुसरी- दीड किलो, तिसरी ते पाचवी दोन किंवा तीन किलो तर सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना चार किलोपेक्षा अधिक दप्तराचे ओझे नसावे, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही पाच किलोपेक्षा अधिक ओझे देता कामा नये. परंतु आपल्याकडील मुलांच्या दप्तराचे ओझे हे त्या मुलाच्या शारीरिक वजनाइतके अथवा अधिक असते. खाऊचे दोन डबे , पाण्याची बाटली, रेनकोट- छत्री यामुळे दप्तराचे वजन अधिक वाढते आणि त्यामुळे मणके, स्नायूंची लवकर झीज होणे , डोकेदुखी- पाठदुखी, थकवा, वाढीवर परिणाम, मानसिक ताण, फुप्फुसांच्या कार्यक्षमतेत घट, सांधे आखडणे अशा त्रासांमध्ये वाढ झाली आहे.

students with bags
शाळेत जाताना विद्यार्थी

इतर त्रासात वाहतूक कोंडीची भर

या त्रासांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अधिक भर घालत आहे. ट्रॅफिक जॅममुळे  शाळेतील मुले दप्तराची बॅग दोन ते तीन तास अधिक वेळ पाठीवर ठेवत असल्यामुळे त्यांच्या खांद्याला इजा होत असून त्यावर भार येत आहे. जोपर्यंत वाहतूक कोंडीची समस्या कमी होत नाही तोपर्यंत पालकांनी आपल्या मुलांना कमी वजनाची बॅग द्यावी. तसेच, घरी आल्यावर त्यांना अर्धा तास तरी  सक्तीची विश्रांती घेण्यास सांगावी. स्कूलबॅग पाठीवर लावल्यानंतर त्या बॅगचा अथवा दप्तराचा भार सांभाळण्याकरता मुलाला/मुलीला समोर वाकावे लागत आहे, असे दिसले की समजावे की त्या पाल्याला भविष्यात पाठदुखीचा त्रास होणार आहे.

- Advertisement -

प्रश्नावर उपाय योजना करणे गरजेचे

विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे हा प्रश्न मुळात नवीन नाही. २००४ पासून या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. सर्व विषयांची पुस्तके, गृहपाठाच्या वह्या, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा असे साधारणत: पाच ते आठ किलोचे ओझे त्यांना रोज सक्तीने शाळेत न्यावेच लागते. काही शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वाहनांची व्यवस्था केली असली, तरी बहुतांश खासगी शाळांमधले विद्यार्थी पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन रिक्षाने किंवा चालत जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -