घरCORONA UPDATEFlorona: कोरोना ,डेल्टा आणि ओमिक्रोन नंतर आता आला फ्लोरोना

Florona: कोरोना ,डेल्टा आणि ओमिक्रोन नंतर आता आला फ्लोरोना

Subscribe

जगभरात सध्या ओमिक्रॉनचा धोका वाढत असताना फ्लोरोना व्हेरिएंटने पुन्हा एकदा नवी भिती निर्माण केली आहे. 

देशभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची दहशत सुरू आहे. त्यातच आता इस्राइलमध्ये फ्लोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. फ्लोरोना हा कोरोना आणि इन्फ्लूएंजाचे डबल इंनफेक्शन असल्याचे सांगितले जाते. अरब न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, इस्राइलमध्ये शुक्रावारी कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काही फ्लोरोनाचे रुग्ण देखील आढळून आले आहेत. इस्राइलच्या आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी इस्राइलमध्ये ५ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.

 

- Advertisement -

जगभरात कोरोना नंतर त्याचे अनेक व्हेरिएंट समोर येत आहे. कोरोनाच्या सगळ्या व्हेरिएंटमधील डेल्टा व्हेरिएंट सर्वात धोकादायक होता. त्यानंतर आता आलेला ओमिक्रॉन व्हेरिएंट देखील धोकादायक ठरु शकतो असे म्हटले जात आहे.  जगभरात सध्या ओमिक्रॉनचा धोका वाढत असताना फ्लोरोना व्हेरिएंटने पुन्हा एकदा नवी भिती निर्माण केली आहे.

 

- Advertisement -

इस्राइलमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना लसीचा चौथा बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता इस्राइलमधील कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या नागरिकांना चौथा बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. इस्राइलचे आरोग्य अधिकारी नचमन ऐश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध नागरिकांना कोरोना विरोधी लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर आहे अशा नागरिकांना तिसरा आणि आता चौथा बुस्टर डोस देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

इस्राइलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून एका दिवशी ८ हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. इस्राइलमध्ये आतापर्यंत १,३८०,०५३ कोरोना रुग्ण आढळले. इस्राइलमध्ये कोरोना नवे रुप धारण करत असून नव्या फ्लोरोना व्हायरसने देखील शिरकाव केला आहे.


हेही वाचा – omicron- ओमीक्रॉनचा हाहाकार, अन्नपाण्याविणा लोकांचे हाल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -