घरदेश-विदेशLockDown: मिशन गगनयान मोहिमेला होऊ शकतो विलंब - इस्त्रो

LockDown: मिशन गगनयान मोहिमेला होऊ शकतो विलंब – इस्त्रो

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्यामुळे मिशन गगनयान मोहिम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता इस्त्रोने वर्तवली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या मिशन गगनयान मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेची तयारी सध्या सुरू असून, या मोहिमेला लॉकडाउनमुळे उशिर होण्याची शक्यता इस्रोच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली. चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने मिशन गगनयान मोहिमेवर काम सुरू केले. ही भारताची पहिली मानवरहित अवकाश मोहीम असणार आहे. या मोहिमेवर काम सुरू असतानाच कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन घोषित झाला. त्याचा परिणाम मिशन गगनयानवर होण्याचे संकेत इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

हेही वाचा – काय म्हणावं याला? महिला अधिकारीच बसल्या दारूच्या ठेक्यावर!

- Advertisement -

काय म्हणाले इस्त्रोचे अधिकारी

या मोहिमेतंर्गत सुरूवातीला मानवरहित दोन फ्लाईट्स पाठवण्याचं नियोजन संस्थेने केले आहे. यातील पहिली फ्लाईट्स डिसेंबर २०२० मध्ये तर दुसरी फ्लाईट जुलै २०२१ मध्ये पाठवण्यात येणार आहे. यासंबंधीत पीटीआयला माहिती देताना अधिकारी म्हणाले की, कोरोनामुळे काही प्रमाणात व्यत्यय आला आहे. पण अजून निश्चितपणे तसे सांगता येणार नाही. आमच्याकडे अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे अंदाज घेण्याची गरज आहे. आम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मिशन गगनयान मोहिमेच्या वेळापत्रकात थोडा बदल होऊ शकतो. पण, संपूर्ण मूल्यमापन केल्यानंतरच हे लक्षात येऊ शकेल. सध्या याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. कारण या मोहिमेवर काम करणाऱ्या पथकानं अद्याप विलंब होण्याबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -