घरताज्या घडामोडीबेहिशेबी मालमत्तेप्रकरणी नायब तहसीलदारासह पत्नीवर गुन्हा

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी नायब तहसीलदारासह पत्नीवर गुन्हा

Subscribe

उत्पन्न स्त्रोतापेक्षा जास्त मालमत्ता संपादन केल्याप्रकरणी सुरगाणा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेले नायब तहसीलदार व त्याच्या पत्नीविरोधात अहमदनगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाराम बाळासाहेब गायकवाड व पत्नी सुशीला राजाराम गायकवाड (दोेघेही रा. रेणुकानगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राजाराम गायकवाड १९८३ मध्ये तलाठी म्हणून अहमदनगर जिल्ह्यात रुजू झाले. त्यांनी पारनेर तालुक्यात हंगा, सुपा, वनकुटे, निघोज, नगर तालुक्यातील जेऊर, सावेडी येथे तलाठी, मंडल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून म्हणून नोकरी केली. सध्या ते पदोन्नतीवर नाशिक जिल्ह्यात सुरगणा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. गायकवाड यांनी १९९१ ते २००४ पर्यंत जादा मालमत्ता संपादीत केली असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर पथकाचे उपअधीक्षक हरीष खेडकर करत आहे.

- Advertisement -

अशी आहे संपत्ती
परीक्षण कालावधीत राजाराम गायकवाड याने केडगाव येथे चार प्लॉट, त्यातील दोन प्लॉटवर दोन मजली बांधकाम, रुई छत्तीशी, सुपा, हंगा, चास, बाबुर्डी, नेप्ती इत्यादी ठिकाणी शेत जमीन, प्लॉट, गाळे खरेदी केले आहे. सावेडी येथील माऊली संकुलमध्ये गाळा खरेदी केला आहे. सुपा येथे देशी व विदेशी दारुचे दुकान, हॉटेल पत्नी व मुलाच्या नावे सुरू केलेले आहे. स्वतःचे नावे, मुलाच्या व पत्नीच्या नावे दोन महिंद्रा एचपी ट्रॅक्टर, दोन चारचाकी, तीन दुचाकी अशी वेगवेगळी वाहने खरेदी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -