घरताज्या घडामोडीCorona Positive : सुप्रीम कोर्टाच्या ४ न्यायाधीशांना कोरोनाची लागण, १५० कर्मचारी क्वारंटाईन

Corona Positive : सुप्रीम कोर्टाच्या ४ न्यायाधीशांना कोरोनाची लागण, १५० कर्मचारी क्वारंटाईन

Subscribe

संपूर्ण जगभरासह ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील इतर राजकीय नेत्यांसोबतच आता कोरोनाने थेट सुप्रीम कोर्टात शिरकाव केला आहे. दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टातील २ न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु आज(रविवार) सुप्रीम कोर्टाच्या ४ न्यायाधीशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर जवळपास १५० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोर्टामध्ये महत्त्वाची कामं किंवा सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत आहेत.

सुप्रीम कोर्टात कोरोनाने कहर केला असून न्यायाधीशांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनी चार वरिष्ठ न्यायमूर्तींसोबत बैठक घेतली. या बैठकीत न्यायाधीशांना त्यांच्या घरातून काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर न्यायाधीश त्यांच्या घरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्यांची सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

संसद भवनात कोरोनाचा कहर

संसद भवनात काम करणाऱ्या ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ६ आणि ७ जानेवारी रोजी संसदेतील कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये ४००हून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, १० जानेवारीपासून तातडीची प्रकरणे, ताजी प्रकरणे, जामीन प्रकरणे, नजर कैदीशी संबंधित प्रकरणे, अटकेची प्रकरणे किंवा अटकपूर्व जामीनासंबंधीत प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.

दिल्लीत २० हजार १८१ नवे कोरोनाबाधित रूग्ण

गेल्या २४ तासांत दिल्लीत २० हजार १८१ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. राजधानी दिल्लीतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख १६ हजार ९७९वर पोहोचली आहे. मागील २४ तासांत दिल्लीत कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या २५ हजार १४३ इतकी झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Sulli Deal App: सुल्ली डील अॅप प्रकरणात मुख्य आरोपीला अटक, मुस्लिम महिला टार्गेटवर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -