घरक्राइमदिल्लीत कोरोना रुग्णांची लुट, कुठे अ‍ॅम्ब्युलन्ससाठी १० हजाराची मागणी तर कुठे औषधांची...

दिल्लीत कोरोना रुग्णांची लुट, कुठे अ‍ॅम्ब्युलन्ससाठी १० हजाराची मागणी तर कुठे औषधांची चढ्या दराने विक्री

Subscribe

देशात कोरोना रुग्ण वाढत असून राजधानी दिल्ली कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट ठरली आहे. दिल्लीत वाढत्या रुग्णसंख्येबरोबरचं आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. याचाच फायदा घेत मेडिकल दुकानदार, अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर कोरोना रुग्णांची अक्षरश: लूट करत आहेत. रुग्णांकडून कुठे अ‍ॅम्ब्युलन्ससाठी १० हजाराची मागणी केली जात आहे तर औषधांची चढ्या दराने विक्री सुरु आहे. अशाप्रकारे साऊथ ईस्टमध्ये कोरोना रुग्णांला रुग्णालयात सोडण्यासाठी जादा पैशांची मागणी करणाऱ्या आणि चौपट भावाने मेडिकल इक्लिपमेंट विकणाऱ्या मेडिकल दुकानदाराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीतील जामिया नगर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एका मेडिकल दुकानात कोरोनासंबंधित इक्विपमेंट चौपट दराने भावाने विकले जाते होते. यावेळी पोलिसांनी आरोपी मेडिकल दुकानदाराला रंगेहाथ पकडण्यासाठी एक पथक तयार केले. यावेळी पोलिसांनी एका ग्राहकाला संबंधीत मेडिकल दुकानात पाठवले व कोरोना रुग्णांना उपचारांसाठी वापरण्यात येणारी मेडिकल इक्विपमेंटची मागणी करण्यास सांगितले. यावेळी मेडिकल दुकानदाराने इक्विपमेंटवरील छापील किंमतीपेक्षा चौपट दराने ती वस्तू ग्राहकाला दिली. याचवेळी पोलिसांचा पथकाने मेडिकल दुकानावर छापा टाकत दुकानदार सुधीर गहलोतला अटक केली. व त्याचाजवळील ३ ऑक्सिजन फ्लो मीटर, २ वॉटर नोजल आणि १८ ऑक्सिजन पंप जप्त केले आहेत. तसेच जामिया नगर पोलीस स्थानकात सुधीर गहलोतविरोधात एफआयआर दाखल करत अटक केले.

- Advertisement -

तर दुसरीकडे कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णाला १० किलोमीटर अंतरावर नेण्यासाठी रुग्णांचा नातेवाईकांकडे तब्बल १० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपीला ओखला पोलिसांनी अटक केली आहे. १ मे रोजी सय्यद शाहनवाज यांनी एका अ‍ॅम्ब्युलन्सड्रायव्हरने १० किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी तब्बल ९ हजारांची मागणी केली असल्याचा आरोप करत अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरचा मोबाईल नंबर देत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

यावेळी पोलिसांनी संबंधीत अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला फोन करत १० किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स बुक करायची असल्याचे सांगितले. यावेळी आरोपी अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरने ९ हजार होतील असे सांगितले परंतु काही वेळाने ६ हजार रुपयांमध्ये रुग्णास रुग्णालयात सोडण्यास तयार असल्याचे सांगितलेय. यावेळी रुग्णांचा परिस्थितीचा फायदा घेत अधिकचे भाडे आकारणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला पोलिसांचा पथकाने अटक केली असून य़ा अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरचे नाव बबलू असे आहे. कमी वेळात अधिक पैसा कमावण्यासाठी असह्य रुग्णांचा नातेवाईकांकडून अधिकची रक्कम वसूल करत असल्य़ाची कबूली आरोपी बबलूने दिली आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -