घरठाणेराईसमिल मालक रमेश अग्रवाल गोळीबार प्रकरणी आणखी एकला अटक

राईसमिल मालक रमेश अग्रवाल गोळीबार प्रकरणी आणखी एकला अटक

Subscribe

रमेश अग्रवाल यांच्यावरील हल्ला हा पूर्व नियोजित कट असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांकडून वर्तवण्यात आला आहे.

शहापुरातील राईसमिल मालकावर पाच दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून राईसमिलचे मालक रमेश अग्रवाल यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. शहापूरातील राईसमिलचे मालक रमेश अग्रवाल यांच्यावर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास  मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी  गोळीबार केेल्याची धक्कादायक घटना घडली होती. शहापुरातील गंगारोड येथील त्यांच्या राईसमिल मधून ते निघत असताना बाईक वरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी अग्रवाल यांच्यावर गोळीबार करून ते फरार झाले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून शहापुरात खबरदारी म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

- Advertisement -

शहापूर पोलिसांना याप्रकरणी काही धागेदोरे हाती लागले असून एकाला यापूर्वीच अटक करण्यात आली आह याप्रकरणी आता अन्य एकाला अटक करण्यात आली असून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. रमेश अग्रवाल यांच्यावरील हल्ला हा पूर्व नियोजित कट असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांकडून वर्तवण्यात आला असून याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -