घरताज्या घडामोडीदेशात 18+ मोफत लसीची घोषणा, मग खासगी हॉस्पिटलमध्ये लस विकत का घ्यायची...

देशात 18+ मोफत लसीची घोषणा, मग खासगी हॉस्पिटलमध्ये लस विकत का घ्यायची ? – राहुल गांधी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित करताना देशातील १८ वयोगटावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याबाबतची घोषणा केली. या घोषणेनंतर अवघ्या काही मिनिटातच राहुल गांधी या घोषणेच्या निमित्ताने प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी मोफत लसीकरणाच्या घोषणेबाबत प्रश्न उपस्थित करताना खाजगी हॉस्पिटलमध्ये आकारल्या जाणाऱ्या पैशांबाबत मोदी सरकारला विचारणा केली आहे. याआधीच सोमवारी सकाळी ट्विट करताना राहुल गांधी यांनी ब्ल्यू टीकवर प्रश्न केला होता.

काय म्हणाले राहुल गांधी ?

राहुल गांधी यांनी कोरोनाविरोधी मोफत लसीकरणाच्या निमित्ताने मोदी सरकारला एक प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी म्हणतात, ”एक सोपा प्रश्न, जर सर्वांसाठी लस मोफत असेल, तर खाजगी रूग्णालयांमध्ये ही लस देण्यासाठी पैसे का आकारले जात आहेत ? असा सवाल त्यांनी केला. त्यांनी एकुणच खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार खासगी हॉस्पिटलला देशात उपलब्ध लसीपैकी एकुण २५ टक्के लस मिळणार आहे. पण या लसीची किंमत मोदी सरकारने आज जाहीर केली. खासगी हॉस्पिटलला एका लसीच्या डोससाठी १५० रूपये कमाल असे आकारता येतील. त्यामुळे ज्यांना लस विकत घ्यायची आहे, त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस उपलब्ध होईल, असे पंतप्रधानांनीही जाहीर केले होते. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासगी हॉस्पिटलच्या लसीच्या उपलब्धततेच्या निमित्ताने तसेच या हॉस्पिटलकडून आकारण्यात येणाऱ्या लसीच्या डोसच्या निमित्ताने केंद्रावर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

याआधी न्यायालयानेही लसीच्या उपलब्धततेबाबत काही सुनावण्यांमध्ये विचारणा केली होती. खासगी हॉस्पिटलला लस आणि इंजेक्शन कसे काय उपलब्ध होते असा सवाल न्यायालयाने काही प्रकरणांमध्ये केला होता. तर काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने रेमडेसिवीरची उपलब्धतता तसेच ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धतता यासारख्या विषयावरही प्रश्न उपस्थित केले होते. सेलिब्रिटींना आणि राजकीय नेत्यांना कसे काय इंजेक्शन्स आणि ऑक्सिजन्स उपलब्ध होतात ? असा सवाल न्यायालयाकडून करण्यात आला होता.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -