घरदेश-विदेशचंद्राचे दुर्मिळ रूप बघता येणार; १३ सप्टेंबरला १३ वर्षांनी खास योग

चंद्राचे दुर्मिळ रूप बघता येणार; १३ सप्टेंबरला १३ वर्षांनी खास योग

Subscribe

आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून २ लाख ५१ हजार ६५५ मैल असणार दूर

आज १३ सप्टेंबररोजी तब्बल १३ वर्षांनी खास योग जुळून येणार आहे. या आजच्या दिवशी चंद्राचे दुर्मिळ रूप पाहायला मिळणार आहे. या चंद्राच्या या रूपाला हार्वेस्ट असेही म्हटले जाते. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टनमध्ये संध्याकाळी चंद्र ७.३० वाजता दिसणार असल्याचे सांगून लोक हा चंद्र बघू शकतात. साधारण चंद्रोदय हा सूर्यास्तानंतर ५० मिनिटांनी होतो. मात्र आजच्या दिवशी चंद्रोदय फक्त ५ मिनिटांनी होणार आहे.

- Advertisement -

म्हणून फुल हार्वेस्ट मून पडले…

हा हार्वेस्ट मून आज दिसणारा चंद्र नेहमीपेक्षा आधी प्रचंड प्रकाश पसरवतो. तर नेहमीच्या पुर्ण चंद्रापेक्षा लहान आकाराचा असतो. हा चंद्र अमेरिकेच्या प्राचीन काळात उन्हाळ्यात शेतीला फायद्याचा होता कारण, तोडणीकरिता या चंद्राच्या प्रकाशाचा वापर केला जात होता, यामुळे पश्चिम अमेरिकेत फुल हार्वेस्ट मून असे या चंद्राचे नाव ठेवण्यात आले. तसेच या चंद्राला कॉर्नमून असे देखील ओळखले जाते, कारण या प्रकाशात शेतकरी मक्याची कणसे तोडत होते.

आज चंद्राचा आकार छोटा असणार

आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून २ लाख ५१ हजार ६५५ मैल दूर असणार आहे. हे अंतर मायक्रो मूनपेक्षा ८१६ मैल दूर असणार आहे. तर सुपर मून मायक्रो मूनपेक्षा २ हजार ०३९ मैल पृथ्वीच्या जवळ असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -