घरदेश-विदेशवीर जवानाची पत्नी बनणार लेफ्टनंट

वीर जवानाची पत्नी बनणार लेफ्टनंट

Subscribe

भारतीय लष्करातील शहिद मेजर प्रसाद महाडिक यांची पत्नी गौरी महाडिक यांनी लष्करात भरती होण्याच निर्णय घेतला आहे. लेफ्टीनंट पदासाठी अर्ज करण्या त्यांनी निर्णय केला आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना मेजर प्रसाद महाडिक हे शहीद झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नीने भारतीय लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. पती गेल्याचे दुःख त्यांना होते मात्र तरीही देशासाठी काही करायचे म्हणून त्यांनी लष्करदलात जाण्याचा निर्णय घेतला. ३० डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या स्फोटात त्यांचे पती प्रसाद महाडिक शहीद झाले होते. त्यांच्या निधनाचा कुटुंबीयांना धक्का बसला होता. मात्र त्या धक्क्यातून स्वतःला सावरत त्यांच्या पत्नीने लष्करात भर्ती होण्याचा निर्णय घेतला. सैन्यात भरती होण्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा द्यावी लागते. गौरी या परिक्षेमध्ये उतीर्ण झाल्या आहेत.


काय म्हणाल्या गौरी?

‘मेजर शहीद झाल्यानंतर १० दिवसांनंतर मी विचार केला की मी आता पुढे काय करणार? मला काही तरी करायचे होते. एका जागी राहून मी रडत बसणार नव्हते. कारण मी कायम आनंदात रहावे अशी माझी इच्छा होती. माझं हसणं त्यांना आवडायचं. त्यामुळे रडायचं नाही असा मी विचार केला. मला त्यांच्यासाठी काही करायचे अशी इच्छा होती. मी त्यांच्यासाठी वर्दी परिधान करेन.’ – गौरी महाडिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -