घरताज्या घडामोडीGermany : जर्मनीत लस न घेणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी बंदीचा निर्णय

Germany : जर्मनीत लस न घेणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी बंदीचा निर्णय

Subscribe

दोन कुटूंबामध्ये भेटतानाही व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा

लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींवर बंदी घालण्याचा निर्णय जर्मनीने घेतला आहे. काही गोष्टींचा आणि सेवांचा वापर करण्यासाठी मज्जाव करण्याचा निर्णय जर्मनीने घेतला आहे. ज्या नागरिकांनी लसीकरण पूर्ण केले नाही, अशा व्यक्तींना या सेवा वापरण्यासाठी मज्जाव करण्याचा हा निर्णय आहे. कोरोना (Covid-19) चा प्रसार आणि संसर्ग रोखण्यासाठी जर्मनीत लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळेच लसीकरणात सहभागी न होणाऱ्या किंवा लसीकरण अपुर्ण असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनात बंदी घालण्याची घोषणा ही जर्मन चॅन्सलर एंजेला मार्केल यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक जीवनात कोणत्या गोष्टींवर येणार मर्यादा ?

जर्मनीमध्ये लसीकरण अपूर्ण किंवा न केलेल्या व्यक्तींसाठी सार्वजनिक आयुष्यात बंदी घालण्याच्या निर्णयात काही ठराविक सेवा सुविधा आणि गोष्टींचा वापर करण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. त्यामध्ये लोकांना सार्वजनिक आयुष्यात बिगर अत्यावश्यक सेवेच्या दुकानांचा वापर करणे, रेस्टॉरंट, क्रीडांगणे, सांस्कृतिक ठिकाणे यासारख्या स्थळांवर जाण्यापासून रोखण्यात येणार आहे. देशात लसीकरणाबाबतचा निर्णय जाहीर झाल्यानेच त्यासाठीचा प्रयत्न म्हणूनच कोरोनाचा अटकाव करण्यासाठी हा प्रयत्न होत आहे. कोरोना लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनात बंदी घालण्याची घोषणा ही जर्मन चॅन्सलर एंजेला मार्केल यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

देशपातळीवरच लोकांना सांस्कृतिक ठिकाणे तसेच क्रीडांगणे, रेस्टॉरंट यासारख्या ठिकाणी बंदी घालण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत. अशा व्यक्तींना सार्वजनिक आयुष्यात सहभागी होता येणार नाही. त्यामध्ये covid-19 चा प्रसार रोखता यावा हेच उदिष्ट आहे. त्यांना बार, रेस्टॉरंट आणि सिनेमा थिएटर्समध्ये प्रवेशापासून बंदी घालण्यात येणार आहे. देशपातळीवर मोठ्या नेत्यांनी याबाबतच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आहे.

त्यासोबतच आगामी दिवसात येऊ घातलेल्या ख्रिसमस सेलिब्रेशनमध्येही अशा व्यक्तींना मज्जाव करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींनी लसीकरण पूर्ण केले नाही, अशा व्यक्तींपर्यंत हा संदेश थेट पोहचावा जेणेकरून ते लसीकरणात सहभागी होतील असा यामागचा उद्देश आहे. ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये किती व्यक्तींना एकत्र जमता येईल यावरही बंधने येणार आहेत. त्यामुळे ठराविक लोकांनाच एकत्र येऊन सेलिब्रेशन करता येणार आहे.

- Advertisement -

लसीकरण न झालेल्या व्यक्तींना खाजगी पद्धतीने लोकांशी संपर्क करता येणार आहे, पण त्यासाठी ठराविक व्यक्तींच्या उपस्थितीला मंजुर देण्यात येईल. एखादी १४ वर्षांहून अधिक वयोगटाची व्यक्ती ही दुसऱ्या कुटुंबातील फक्त दोन व्यक्तींसोबतच भेटू शकणार आहे. जेव्हा सर्वच व्यक्तींचे लसीकरण होईल, तेव्हा ही मर्यादा घालण्यात येणार नाही.

आपल्या देशातील परिस्थिती अतिशय ही अतिशय चिंताजनक झाली आहे, असे मेर्केल यांनी पत्रकारांना बर्लिन येथे सांगितले. देशपातळीवर एकसंघ पद्धतीने वागण्यासाठीची ही कृती म्हणून ही नियमावली लागू करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लसीकरणात लोकांनी सहभागी व्हावे यासाठीच ही नियमावली अंमलात आणत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या लसीकरणात सहभागी होईल, असा नियमावलीच्या अंमलबजावणीचा उद्देश आहे. आगामी काही दिवसांमध्ये ही नियमावली अंमलात येईल असेही त्यांनी जाहीर केले. सध्याची परिस्थिती पाहता अशा प्रकारचा निर्णय घेणे गरजेचे होते असेही त्यांनी म्हटले आहे. जर्मनीमध्ये गुरूवारी ७३ हजार २०९ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. रॉबर्ट कोच इंस्टिट्यूटमध्ये ३८८ नव्या कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. जर्मनीत आतापर्यंत १ लाख २ हजार १७८ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -