घरताज्या घडामोडीCoronaVirus: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाच हजारवर!

CoronaVirus: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाच हजारवर!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूनचा फैलाव वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्र आढळले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई परिस्थिती चिंताजनक होत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमित शहर हे मुंबई आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा संख्या पाच हजारावर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७ हजार ७६२८ झाला आहे.

राज्यातील काही भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्या भागातील लॉकडाऊनची मुदत वाढण्याची शक्यता असल्याचे समोर येत आहे. मुंबईसह ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असल्याने या क्षेत्रातील लॉकडाऊन ३ मे नंतरही सुरूच ठेवण्याची सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने केली आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागाला दिलासा मिळणार असला तरी मुंबई, पुणे, व ठाणे जिल्ह्याला मात्र लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहेत.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत देशात १ हजार ९९० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ हजार ४९६वर पोहोचला आहे. यामध्ये १९ हजार ८६८ रुग्ण अॅक्टिव्ह असून ५ हजार ८०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – LockDown: लवकरच कोटामध्ये अडकलेले २००० विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -