घरदेश-विदेशट्रेनमध्ये सापडली सोन्याची बिस्कीटं! मात्र घेण्यास कोणी आलेच नाही

ट्रेनमध्ये सापडली सोन्याची बिस्कीटं! मात्र घेण्यास कोणी आलेच नाही

Subscribe

ऑक्टोबरपासून आतापर्यंत एकूण ९ महिने झाले आहेत, परंतु सुमारे १.४५ कोटी किंमतीचे सोन्याचे बिस्किटे घेण्यास कोणीही आले नाही.

लोक अनेकदा ट्रेनमध्ये सामान विसरतात. पण ट्रेनमध्ये कोणी सोन्याची बिस्किटं विसरल्याचे तुम्ही कधी ऐकले का? नाही नं… मात्र हे खरंय. कोणीतरी आपले दीड कोटी रुपयांचे सोन्याची बिस्किटं ट्रेनमध्ये सोडले आहेत. यानंतर आता त्या देशाचे प्रशासन म्हणत आहे की, ते कोणाचे आहेत? त्यांनी येऊन ते घेऊन जावे. मात्र त्यांना नेण्यास कोणी तयार नाही.

स्वित्झर्लंडमधील उत्तरेकडील शहर सेंट गॅलन येथे रेल्वेमध्ये प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना १९०,००० डॉलर्स म्हणजेच दिड करोड रुपयांचे सोन्याची बिस्किटं मिळाल्याचा अहवाल सीएनएनने दिला आहे. ही घटना गेल्या वर्षातील ऑक्टोबरची आहे, पण सीएनएनने नुकताच त्याचा अहवाल सादर केला आहे.

- Advertisement -

स्वित्झर्लंडच्या ल्युसेर्न शहरातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑक्टोबरपासून इतके दिवस उलटून गेले आहेत, परंतु कोटींचे असणारे हे सोन्याचे बिस्किटं घ्यायला अद्याप कोणीच आले नाही.  यानंतर, लुसर्न शहराच्या प्रशासनाने घोषित केले की, हे कोणाचे सोने आहे, त्यांनी येऊन ते घेऊन जावे. त्या व्यक्तीकडे केवळ पाच वर्षांसाठी हे सोने परत घेण्याची संधी आहे. यानंतर त्या व्यक्तीची या सोन्यावरील मालकी संपून जाईल.

- Advertisement -

नाव न छापण्याच्या अटीवर लुसेर्न शहराच्या प्रवक्त्याने सांगितले की, पोलिस आणि प्रशासनाकडे काही लोकांची चौकशी केली गेली आहे. मात्र अद्याप ते घेण्यास कोणीही आले नाही. म्हणूनच आम्हाला ही शंका आहे की, हे सोने बेकायदेशीर असू नये. कुठेही हा प्रकार सोन्याच्या तस्करीचा तर नसावा…?

मात्र अडचण अशी आहे की, ऑक्टोबरपासून आतापर्यंत एकूण ९ महिने झाले आहेत, परंतु सुमारे १.४५ कोटी किंमतीचे सोन्याचे बिस्किटे घेण्यास कोणीही आले नाही. यापूर्वीही अशी घटना घडली होती. २०१७ मध्ये बर्‍याच रेस्टॉरंट्सच्या टॉयलेटमध्ये ५०० युरोच्या नोटा सापडल्या होत्या. हे काम कोणी केले आहे, आजपर्यंत हा प्रकार कोणी केला हे कोणालाही कळू शकले नाही.


अंबानींची वचनपूर्ती; रिलायन्स समूह झाला कर्जमुक्त
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -