घरदेश-विदेशCovid 19: भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यासाठी देणार ११३ कोटी; Google ची...

Covid 19: भारतात ८० ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यासाठी देणार ११३ कोटी; Google ची मोठी घोषणा

Subscribe

तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख आणि प्रसिद्ध कंपनी गुगलने गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, गुगलची एक संस्था Google.org विविध संघटनांसह देशात ८० ऑक्सिजन प्लांट्स खरेदी व स्थापनेसाठी आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवा कामगारांच्या कौशल्य विकासासाठी ११३ कोटी रूपयांची मदत करणार आहे. या घोषणेअंतर्गत Google.org गीव्हइंडियाला साधारण ९० कोटी रुपये आणि ८० ऑक्सिजन प्रकल्प स्थापित करण्यासाठी साधारण १८.५ कोटी रुपये देणार आहे. यासह ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अपोलो मेडस्किलच्या माध्यमातून २०,००० फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड -१९ व्यवस्थापनात प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

यासाठी Google.org ला भारताच्या १५ राज्यांत १ लाख ८० हजार आशा कामगार आणि ४० हजार एएनएमच्या कौशल्य विकासासाठी ३.६ कोटींचे अनुदान देणार आहे. ही संस्था या अनुदानाचा उपयोग अतिरिक्त पाठबळ आणि सल्ल्यासाठी देणार आहेत. यासह आशा आणि एएनएमला अतिरिक्त सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यासाठी संस्था या अनुदानाचा वापर करणार असल्याचेही कंपनीकडून सांगितले जात आहे. यावेळी गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि व्हाइस प्रेसिडेंट संजय गुप्ता म्हणाले, “गुगलवर आम्ही लोकांना खात्री करुन दिली आहे की सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेली माहिती आणि साधने आपल्याकडे असणं आवश्यक आहे.

- Advertisement -

यापूर्वी युनिसेफने जागतिक सहकार्य म्हणून भारतात ९ ऑक्सिजन प्लांट स्थापित करण्याची घोषणा देखील केली आहे. याव्यतिरिक्त, युनिसेफने भारताला ४ हजाक ५०० हून अधिक ऑक्सिजन कन्संट्रेटर आणि २०० आरटी-पीसीआर चाचणी मशीन उपलब्ध करुन दिल्या आहेत. हे ९ ऑक्सिजन कन्संट्रेटर गुजरात, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरामधील रुग्णालयांमध्ये लावण्यात आले आहेत. यासह युनिसेफने असेही सांगितले की, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांत ४ हजार ६५० ऑक्सिजन कन्संट्रेटर खरेदी करण्यात आली आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ३ हजार ऑक्सिजन कन्संट्रेटर वापरण्यासाठी खरेदी केली गेली होती. याव्यतिरिक्त, ५१२ हाय फ्लो नेजल कॅन्यूल देखील १९ राज्यात पाठविले गेले.


Green Fungus: काळ्या, पांढऱ्या, पिवळ्या बुरशीनंतर आढळला हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण; जाणून घ्या

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -