घरताज्या घडामोडीकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सायकल असू शकते प्रमुख शस्त्र!

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सायकल असू शकते प्रमुख शस्त्र!

Subscribe

याबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारला सल्ला दिला.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. लॉकडाऊन दरम्यान सध्या लोक प्रवासाठी आपल्या वैयक्तिक वाहनांचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यांना सायकलप्रमाणे बिगर-मोटार चलित वाहनांना प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने सार्वजनिक वाहतूक प्रणालीत कॅशलेस तंत्रज्ञान लागू करण्यास राज्यांना सांगितलं आहे.

न्यूयॉर्कमध्ये ६५ किमी नवीन लेन सायकल चालकांसाठी तयार केली आहे. ऑकलॅडने १० टक्के रस्ते मोटार वाहनांसाठी बंद केले आहेत. याच प्रमाणे राज्य आणि मेट्रो रेल्वे कंपन्यांना सल्ला देताना मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सांगितलं की, संपूर्ण भारतात बिगर-मोटार चलित वाहनांना प्रोत्साहन द्यायला हवे आणि पुन्हा वापर करण्यास सांगावे. सरकारी सूचनेनुसार अधिकांश शहरातील प्रवास ५ किमीच्या आत असतो. कोरोनाच्या परिस्थितीत बिगर-मोटार वाहनांचा वापर करणे अधिक योग्य आहे. यामध्ये कमी खर्च आणि कमी मानव संसाधनाची आवश्यकता असते.

- Advertisement -

सार्वजनिक वाहतुकीतच्या ठिकाणी संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता असणे महत्त्वाचे आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीत कॅशेलस सिस्टमचा वापर केल्याने मानवी संपर्क कमी होईल, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.


हेही वाचा – अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मनात जे आहे तेच होईल – उदय सामंत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -