ढगफुटीमुळे स्थगित झालेल्या अमरनाथ यात्रेला हिरवा कंदील, यात्रेकरूंमध्ये उत्साह

जम्मूमधील बेस कँम्पमधून यात्रेकरू अमरनाथ गुहेच्या दिशेने रवाना झाले आहेत. ढगफुटी यात्रेकरूंना अमरनाथ गुहेच्या दिशेने जाण्यास बंदी घालण्यात आली होती, मात्र आता यात्रा पुन्हा सुरू झाल्याने यात्रेकरूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे

नुतक्याच काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील तीर्थक्षेत्र अमरनाथ गुहेजवळ मोठ्या प्रमाणात ढगफुटी होऊन दुर्घटना घडली होती. या सर्व प्रकारामुळे अमरनाथ यात्रा स्थिगित करण्यात आली होती. दरम्यान, आता अमरनाथ येथील वातावरण पूर्वरत झाल्याने यात्रेला पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे. जम्मूमधील बेस कँम्पमधून यात्रेकरू अमरनाथ गुहेच्या दिशेने रवाना झाले आहेत. ढगफुटी यात्रेकरूंना अमरनाथ गुहेच्या दिशेने जाण्यास बंदी घालण्यात आली होती, मात्र आता यात्रा पुन्हा सुरू झाल्याने यात्रेकरूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

८ जुलैला रोजी होती ढगफुटीमुळे
८ जुलै रोजी अमरनाथ गुहेजवळ मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, त्याच दरम्यान ढगफुटी होऊन पूर आला. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण अजूनही बेपत्ता आहेत. तर जखनी लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ८ जुलै रोजी अचानक मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाल्याने अमरनाथ यात्रा काही वेळासाठी स्थिगित करण्यात आली होती. त्यामुळे यात्रेसाठी आलेले यात्रेकरू यात्रा पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते.

खरंतर, कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून भारतातील सर्व तीर्थ क्षेत्र बंदी घालण्यात आली होती. दरम्यान दोन वर्षानंतर आता यात्रा चालू झाल्या आहेत. त्यामुळे यात्रेकरूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी यात्रेकरूंनी आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्या आहेत. त्यात ते म्हणाले की, ‘आम्ही भोलेनाथ बाबांच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहोत, भोलेनाथांचा आर्शिवाद घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही. यात्रा पुन्हा सुरू झाल्याने आम्ही खूप खूश आहोत. यात्रेवेळी सुखरूप जाण्यासाठी CRPF आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत आहे.’


हेही वाचा :श्रीलंकेत राष्ट्रपतीभवन बनलं पिकनिक स्पॉट, आंदोलकांचा स्विमिंग पूलमध्ये धिंगाणा