घरदेश-विदेशमुलींना नाचवून केला जात होता बलात्कार - सीबीआय

मुलींना नाचवून केला जात होता बलात्कार – सीबीआय

Subscribe

बालिका गृहात येणाऱ्या पाहुण्यांसाठी मुलींना नाचवण्यात येत होते नकार देणाऱ्या मुलींना जेवण दिले जात नसल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

मुझ्झफरपूर येथील बालिका गृहात असलेल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी ब्रजेश ठाकूर याला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर या गृहात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल अधिक माहिती समोर आली आहे. बालिका गृहात येणाऱ्या पाहूण्यांसाठी गाणी लावली जात होती. या गाण्यांवर मुलींना नाचवले जायचे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. या प्रकरणी सीबीआयने ७३ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. १९ डिसेंबर रोजी विशेष पाक्सो न्यायालयात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. पाहूण्यांना खूश करण्यासाठी या मुलींना नाचवले जात असल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे.

काय केले आरोप

या बालिकागृहात मुलींना ड्रग्स देण्यात येत होते आणि लैंगिक अत्याचारही केले जात होते. ठाकूरसोबत अन्य २१ जण या आरोपात सहभागी आहे. या बालिकागृहात ३३ मुलींवर अत्याचार झाले आहेत. ज्यामुलींनी नाचण्यास नकार दिला त्यांना रात्री जेवण दिले जात नव्हते. जेवणात चपाती आणि मीठ दिल्या जात होते. नाचणाऱ्या मुलींना चांगले जेवण दिले जात होते असे आरोपपत्रात लिहिले आहे.

- Advertisement -

बाल अधिकार कार्यकर्त्यांनी केला प्रश्न उपस्थित

बाल अधिकार कार्यकर्ते आणि वकील के.डी. मिश्रा यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “पोलिसांना या घटने बाबत माहिती असून देखील पाक्सो कायद्या अंतरर्गत गुन्हा का नोंदवण्यात आला नाही?.” असा प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित केला आहे.

यांच्या विरोधात केले आहेत आरोप

इंदु कुमारी, मिनू कुमारी, मांजू देवी, चंदा देवी, नेहा कुमारी, हेमा मशिह, किरण कुमारी, सैस्ता परवीन उर्फ ​​मधु, डॉ. प्रमिला, किरण कुमारी, रामानुज ठाकूर उर्फ ​​मामु, रामशंकर सिंह उर्फ ​​मास्टर साहेब, रवि कुमार रोशन, विकास कुमार, दिलीप कुमार वर्मा, विजय कुमार तिवारी, गुड्डू कुमार पटेल ऊर्फ गुड्डू, कृष्णा कुमार राम उर्फ ​​कृष्णा, रोझी रानी, ​​आणि डॉ अश्विनी उर्फ ​​असमानी यांची नावे आरोपपत्रात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -