घरदेश-विदेशGujarat CM: गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटलांच्या नावाची चर्चा, इतर नेतेही शर्यतीत

Gujarat CM: गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटलांच्या नावाची चर्चा, इतर नेतेही शर्यतीत

Subscribe

विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. (Gujarat CM Vijay Rupani Resigns) निवडणुका डोळ्यासमोर असताना रुपाणी यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्याने नवा मुख्यमंत्री कोण? अशा चर्चा सुरु झाल्या असून त्यासाठी नावांच्या चर्चा देखील सुरु झाली आहे. यात चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्याने मुख्यमंत्रीपदासाठी पाच नावांची चर्चा आहे. यात प्रामुख्याने विद्यमान उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील, आणि गोवर्धन जदाफिया, अशी नावं चर्चेत आहेत. मात्र, गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं प्राबल्य लक्षात घेता पाटीदार समाजातील किंवा या समाजाचा पाठिंबा असलेल्या नेत्याच्या गळात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

गुजरातमध्ये पटेल समाजाला खूप महत्त्व

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे असण्यामागील एक कारण म्हणजे ते पटेल समाजाचं नेतृत्व करतात. गुजरातमध्ये पटेल समाज राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पटेल समाजामध्ये कडवा आणि लेउवा पटेल यांचा समावेश आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात दोन्ही पाटीदार समाजाला महत्त्व दिलं आहे. पुरुषोत्तम रूपाला हे कडवा पाटीदार आहेत आणि मनसुख मांडवीया हे लेवा पाटीदार आहेत. पण आता ते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत सामील झाले आहेत.

चंद्रकांत पाटील पंतप्रधान मोदींचे विश्वासू

चंद्रकांत पाटील हे प्रभावी संसदपटू मानले जातात. ते आपल्या मतदारसंघातील विकास कामांना प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात माहिर आहेत. गुजरात भाजपने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी २८१ सदस्यीय जंबो कार्यकारिणीची स्थापना केली आहे. त्याची जबाबदारी सी.आर.पाटील यांच्या खांद्यावर आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू मित्र मानले जातात.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -