घरदेश-विदेशVideo : गुजरातमधील जीव धोक्यात घालणारी दिवाळीतील 'गाई गोहरी' प्रथा

Video : गुजरातमधील जीव धोक्यात घालणारी दिवाळीतील ‘गाई गोहरी’ प्रथा

Subscribe

गुजरातील मधील दाहोद जिल्हात दिवाळी साजरी करण्याची आदिवासी लोकांची एक वेगळीच परंपरा असते. ही परंपरा देवाला खुश ठेवण्याच्या हेतूमुळे केली जाते.

दिवाळी म्हटलं की एक प्रकाशमय सण. या सणाला सगळ्यांचा एक वेगळाचं उत्साह असतो. दिवाळी सण साजरा करण्याची प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी असते. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ‘गाई गोहरी’ हा महोत्सव साजरा केला जातो. या भागातील आदिवासी लोकांची ही सण साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे. लोक नवस मागण्यासाठी रस्त्यावर झोपतात आणि त्यावरून गायी आणि बैल धावतात.

हा उत्सव साजरा करण्यापूर्वी पूजा केली जाते. त्यानंतर सर्व जनावरांना रंगांनी आणि मोराच्या पंखांनी सजावट केली जाते. जनावरांच्या पायात घंटा बांधली जातात. येथील स्थानिक लोक दरवर्षी हा उत्सव आयोजित करतात. यापूर्वी पासून सुरू असलेल्या परंपरेत जीव जाण्याच्या देखील धोका असतो. या परंपरेत लोक रस्त्यावर झोपतात आणि त्यांच्यावरून गाय व बैल धावतात. देवाला खुश ठेवणे हा यामागच्या परंपरेचा हेतू असतो.

- Advertisement -

या उत्सवाचा व्हिडिओ एएनआयने ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही ‘गाई गोहरी’ हा उत्सव पाहू शकता. या व्हिडिओमध्ये लोक रस्त्यावर झोपले आहेत आणि त्यांच्यावरून गायी व बैल धावताना दिसत आहे. ही परंपरा जपण्यासाठी हा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -