घरदेश-विदेशकॅलिफोर्नियामधील गुरुद्वारात गोळीबार; दोघांची प्रकृती गंभीर

कॅलिफोर्नियामधील गुरुद्वारात गोळीबार; दोघांची प्रकृती गंभीर

Subscribe

नवी दिल्ली : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅक्रामेंटो येथील गुरुद्वारामध्ये रविवारी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी गुरुद्वारा सॅक्रामेंटो शीख सोसायटी मंदिरात दोन जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या असून एक संशयित पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, दुपारी 2.30 वा. मंदिराच्या मैदानात दोन जणांमध्ये हाणामारी सुरू झाली. यावेळी एका संशयिताने दुसऱ्या संशयिताच्या मित्रावर गोळी झाडली, तर दुसऱ्या व्यक्तीनेही संशयितावर गोळीबार केला आणि तो पळून गेला. या संशयिताचे वय २० ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलीसांनी दिली. हा संशयित पूर्व भारतातील रहिवासी असून पोलीस याचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

गुरुद्वारामध्ये दरवर्षी शीख परेडचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही अशीच परेड काढण्यात येणार होती आणि या परेडमध्ये अमेरिका आणि कॅनडातील जवळपास 50 हजारांहून अधिक लोक सहभागी होतात. त्यामुळे या घटनेचा परेडशी काही संबंध आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

या घटनेत सहभागी असलेले सर्वजण एकमेकांना ओळखत असून इतर लोकांना नुकसान होणार नाही याची गोळीबार करणाऱ्यांनी काळजी घेतली होती. तसेच, पोलिसांनी हा द्वेषाचा गुन्हा मानण्यास नकार दिला आहे. दोन्ही पीडितांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -