घरमनोरंजनपंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेता मिलींद सोमणला विचारलं, 'खरंच?'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेता मिलींद सोमणला विचारलं, ‘खरंच?’

Subscribe

फिट इंडिया मूव्हमेंटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन फिट इंडिया डायलॉग दरम्यान ‘फिट इंडिया एज अपॉपर्टी फिटनेस प्रोटोकॉल’ लाँच केले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी फिटनेस तज्ज्ञ आणि देशभरातील काही लोकांशी संवाद साधला. या दरम्यान पंतप्रधान अभिनेता मिलिंद सोमण यांच्याशीही ते बोलले. यावेळी ‘फिट इंडिया डायलॉग’ अंतर्गत पंतप्रधान मोदींनी मिलिंद सोमण यांना विचारले, “लोकं तुमच्या वयाबद्दल सोशल मीडियावर जे बोलतात ते खरं आहे का? तुम्ही खरोखर ते वयस्कर आहात का!” यावर मिलिंद म्हणाले,”बरेच लोक मला विचारतात … तुम्ही खरोखर ५५ वर्षांचे आहात? त्यांना आश्चर्य वाटते की, मी या वयात ५०० किलोमीटर कसे चालू शकेन?”

त्याचबरोबर पंतप्रधानांनी मिलिंद सोमण यांच्या आईचे कौतुकही केले. यावेळी ते म्हणाले की, त्यांचा फिटनेस व्हिडिओ मागे व्हायरल झाला आणि तो मी ५ वेळा पाहिला. यावर मिलिंद म्हणाले- माझी आई आता ८१ वर्षांची आहे, मग ती हे करु शकते, मला वाटतं की मी तिच्या वयाचा झाल्यास मीही तसे होईल. माझी आई माझा आदर्श आहे. आजकाल आपण बसून असतो. त्यामुळे फिटनेसची पातळी कमी होते. ‘

- Advertisement -

मिलिंद सोमण हे भारताचे पहिले पुरुष सुपर मॉडल असल्याचे म्हटले जाते. मिलिंद सोमण यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली ज्यामध्ये त्यांना प्रचंड यश मिळाले. यानंतर टीव्ही सीरियल ‘कॅप्टन व्योम’ ने त्यांना अभिनय जगतातही यश मिळवून दिलं. या दोन्ही प्रकारांमध्ये फिट झाल्यानंतर मिलिंदने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि तेथेही ते यशस्वी झाले. दरम्यान मिलिंद सोमणने १९८८ मध्ये मॉडेलिंगला सुरुवात केली. यानंतर तो बर्‍याच व्हिडिओंमध्ये आणि जाहिरातींमध्येही दिसला ज्यामुळे तो ९० च्या दशकात रातोरात स्टार झाला. १९९५ मध्ये मिलिंद सोमणने आपली मैत्रीण मधु सप्रे यांच्यासोबत न्यूड फोटोशूट केले. या फोटोशूटमुळे मिलिंदलाच नव्हे तर जाहिरात कंपनीलाही कोर्टाच्या खटल्याला सामोरे जावे लागले.


नव्या कृषी विधेयकांना विरोध; शेतकरी संघटनांचा आज ‘भारत बंद’चा नारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -