घरताज्या घडामोडीMicrosoft चा संकटमोचन CEO सत्या नडेला, सर्व्हर रूम ते कंपनीच्या बोर्ड...

Microsoft चा संकटमोचन CEO सत्या नडेला, सर्व्हर रूम ते कंपनीच्या बोर्ड रूमचा प्रवास

Subscribe

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) अनेक प्रकारच्या अडचणीत असतानाच सत्या नडेला यांना २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्ट सीईओ (Microsoft CEO) पदाची धुरा देण्यात आली. पण या कठीण आव्हानाच्या काळात सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्टला केवळ या संकटातून बाहेर काढल नाही तर कंपनीला एका नव्या उंचीवर पोहचवण्याचे कामही केले. सत्या नडेला यांनी सीईओ पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर क्लाउड कॉंम्प्युटिंग, मोबाईल एप्लिकेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर अधिक भर दिला. त्यासोबतच ऑफिस सॉफ्टव्हेअर फ्रॅंचायसीमध्ये नव्याने जीव फुंकला. नडेला यांच्या नेतृत्वामध्ये मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सच्या किंमतीतही सातपटीने वाढ झाली. त्यामुळेच कंपनीचा मार्केट कॅप हा २ लाख डॉलर्सपर्यंत पोहचला आहे. सत्या नडेला यांची नुकतीच मायक्रोसॉफ्ट चेअरमनपदी वर्णी लागली आहे.

सत्या नडेला यांचा जन्म हा हैद्राबाद येथे १९६७ साली झाला. त्यांचे वडिल हे एक प्रशासकीय अधिकारी होते, तर आई संस्कृतची शिक्षिका होती. प्राथमिक शिक्षण हैद्राबाद पब्लिक स्कूलमधून पुर्ण केल्यानंतर १९८८ मध्ये मनिपाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगचा अभ्यास केला. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्समध्ये एसएस ही पदवी शिक्षण घेण्यासाठी त्यांनी अमेरिका गाठली. त्यानंतर १९९६ मध्ये शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनस येथून एसबीएचे शिक्षण केले.

- Advertisement -

मायक्रोसॉफ्टमध्ये करिअर

आपले पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर सत्या नडेला यांनी सन मायक्रोसिस्टिम कंपनीत कामाला सुरूवात केली. तेव्हापासूनच सत्या नडेला या कंपनीसोबत आहेत. कंपनीमध्ये अनेक जबाबदाऱ्यांवर त्यांनी काम केले आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांच्या कामाची सुरूवात ही सर्वर ग्रुपपासून झाली. त्यानंतर सॉफ्टव्हेअर डिव्हिजन, ऑनलाईन सर्व्हीसेस, रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट, एडव्हरटायजिंग प्लॅटफॉर्म यासारख्या अनेक जबाबदाऱ्यांवर त्यांनी काम केले. या सर्व कालावधीत त्यांनी अनेक महत्वाच्या पदाच्या कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते पुन्हा सर्व्हर डिव्हिजननध्ये परतले. सत्या नडेला यांना क्लाऊड गुरूही संबोधले जाते. त्यांनी क्लाऊड कॉम्प्युटिंगसाठी नेतृत्व केले आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी एक महत्वाची अशी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी ऑनलाईन सर्व्हीसेस डिव्हिजनमध्ये एक वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मायक्रोसॉफ्ट बिझनेस डिव्हिजनमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यानंतर नडेला यांना १९ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या सर्व्हिस एण्ड टूल्स व्यवसायाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. मायक्रोसॉफ्टच्या डेटाबेस, विंडोज सर्व्हर, डेव्हलपर टूल्सला मायक्रोसॉफ्ट अज्योर क्लाऊड प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.

क्रिकेट आणि गोड खाण्याचे शौकीन

सत्या नडेला यांचे १९९२ मध्ये अनुपमा या मुलीशी विवाह झाला. अनुपमा – सत्या यांना तीन अपत्ये आहेत. हे कुटूंब वॉशिंग्टन येथे राहते. सत्या नडेला हे क्रिकेटचे चाहते आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात ते क्रिकेटपासून प्रेरणा घेतात. त्यासोबतच सत्या नडेला यांना फिटनेस आणि धावण्याचीही आवड आहे. गोड खाण्याचेही ते शौकीन आहेत. त्यांना पेस्टी खाणे सर्वाधिक आवडते. त्यांना नेहमीच काही ना काही शिकायला आवडते. तसेच मोकळ्या वेळात ते ऑनलाईन क्लासही घेतात. फावल्या आणि रिकाम्या वेळात त्यांना कविताही वाचायला आवडतात. अनेकदा कवितेची तुलना ते कोडिंगसोबत करतात. अमेरिकन फुटबॉल टीमच्या सीहॉक्सचे ते चाहते आहेत.

- Advertisement -

किती आहे सत्या नडेला यांचा पगार ?

सत्या नडेला यांना २०१९ मध्ये ४.२९ कोटी डॉलर्स म्हणजे ३१६ कोटी रूपयांचा पगार मिळाला. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामध्ये अधिक हिस्सा हा कंपनीच्या शेअर्सचा होता. शेअर्सपोटी त्यांना २.९६ कोटी डॉलर्सची कमाई झाली. तर १.०७ कोटी विनाशेअर्सचे मानधन मिळाले. तर इतर प्रकारच्या स्त्रोतांमधून १ लाख ११ हजार डॉलर्सची कमाई झाली. सत्या नडेला यांना फायनान्शिअल टाईम्स पर्सन ऑफ द ईअर हा पुरस्कार दिला गेला. त्यासोबतच २०२० त्यांना बिझनेस आयकॉन या सन्मानेही गौरविण्यात आले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -