घरताज्या घडामोडीमला मुख्यमंत्री बनायच नाही - रजनीकांत

मला मुख्यमंत्री बनायच नाही – रजनीकांत

Subscribe

मला मुख्यमंत्री कधीच बनायचे नव्हते. बनणारही नाही. मी एक असा पक्ष आणत आहे जिथे ड्युएल अशा स्वरूपाचा प्लॅन असेल. तसेच मी स्वतः कधीच पार्टीचा नेता नसेन. तामिळनाडूत येणारा माझा पक्ष हा पार्टीतील युवा आणि सुशिक्षित उमेदवारांना निवडणुकांसाठी तिकिट देईल. लोकांना राजकारणात बदल पहायचे आहेत, म्हणूनच मी राजकीय पक्ष घेऊन येत असल्याचे सुपरस्टार रजनीकांत यांनी जाहीर केले. रजनीकांत यांनी आज अनेक मोठे राजकीय खुलासे केले. तसेच राजकारणातील सहभागाविषयही त्यांनी आज अनेक पत्ते खुले केले. राजकीय पक्षाची घोषणा करण्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रजनीकांत हे एक पक्षाची सुरूवात करणार आहे ज्यामध्ये त्यांचा राजकीय पक्ष हा सरकारचा भाग बनणार नाही. सरकार आणि राजकीय पक्ष हे स्वतंत्रपणे काम करतील. रजनीकांत जरी स्वतः राजकीय पक्षाचे नेते असले तरीही ते मुख्यमंत्री बनणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही वर्षांपासून मी तामिळनाडूतील राजकारण पाहत आहे. डीएमके आणि एआईडीएमकेचा उल्लेख करतानाच ते म्हणाले की आता लोकांना बदल हवा आहे. रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे की राज्यात तरूणांना संधी देऊन एक नवीन लिडरशीप आणण्याचा पार्टीचा मानस आहे,

- Advertisement -

पार्टी आणि सरकार वेगवेगळे राहणार

रजनिकांत यांनी आपली राजकीय रणनिती जाहीर करतानाच एक ड्युएल प्लॅनची घोषणा केली आहे. पक्षात दोन वेगवेगळे विभाग असतील. त्यामधील एक विभाग हा पक्षाचे काम करेल, तर दुसरा विभाग सरकारचे काम करेल. राजकीय पक्ष हा कधीच सरकारवर दबाव आणणार नाही. चांगल्या चरित्राच्या तसेच उच्च शिक्षण घेतलेल्या तरूणांना संधी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील व्यक्तीलाच सीएम पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

चुकल्यास कारवाईही होणार

आमच्या पक्षात स्वयंमूल्यांकन करण्यात येईल. त्यासाठी पक्षातच प्रश्न विचारले जातील. कोणत्याही चुकीसाठी पक्षाअंतर्गत कारवाई केली जाणारच यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केले. पण समांतर सरकार चालवणार नाही असा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. आमचा प्लॅन हा लोकांमध्ये घेऊन जाणार आहोत. राजकीय पक्षाचा प्लॅन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -