घरदेश-विदेशआयबीपीएसकडून ८१०६ जागांसाठी मेगाभरती, उद्यापासून करता येणार अर्ज

आयबीपीएसकडून ८१०६ जागांसाठी मेगाभरती, उद्यापासून करता येणार अर्ज

Subscribe

8106 जागांसाठी ही भरती असणार आहे. यापैकी ६२१ जागा महाराष्ट्रातून भरण्यात येणार आहेत. या संधीसाठी कोणते उमेदवार पात्र आहेत, परीक्षा शुल्क किती, शैक्षणित पात्रता काय याविषयी खाली माहिती दिली आहे.

बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शनमध्ये (Institute of Banking Personnel Selection) भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी अधिसूचना जारी (IBPS RRB Notification 2022) करण्यात आली असून गट अ अधिकारी (स्के-I, II आणि III) आणि गट ब कार्यालय सहाय्यक (बहुद्देशीय)साठी 8106 जागांसाठी ही भरती असणार आहे. यापैकी ६२१ जागा महाराष्ट्रातून भरण्यात येणार आहेत. या संधीसाठी कोणते उमेदवार पात्र आहेत, परीक्षा शुल्क किती, शैक्षणित पात्रता काय याविषयी खाली माहिती दिली आहे. (IBPS RRB 2022 Recruitment Notification Out; Registration Begins Tomorrow ibps.in)

कोणत्या पदांसाठी आहे भरती?

कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल-I, ऑफिसर स्केल II (कृषी अधिकारी), ऑफिसर स्केल II, (मार्केटिंग ऑफिसर), ऑफिसर स्केल II (ट्रेझरी मॅनेजर), ऑफिसर स्केल II (कायदा), ऑफिसर स्केल II (CA), ऑफिसर स्केल II (IT), Officer Scale II (General Banking Officer), Officer Scale III

- Advertisement -

कुठे अर्ज कराल?

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://www.ibps.in/ या लिंकवर क्लिक करा.

- Advertisement -

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) – कोणत्याही विषयाची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

ऑफिसर स्केल-I

ऑफिसर स्केल II (कृषी अधिकारी) – कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी विषयाची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

ऑफिसर स्केल II (मार्केटिंग ऑफिसर) – कृषी विपणन आणि सहकार, विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

ऑफिसर स्केल II (ट्रेझरी मॅनेजर) – माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

ऑफिसर स्केल II (कायदा) – कायदा विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

ऑफिसर स्केल II (CA) – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया कडून प्रमाणित सहयोगी (CA) पदवी असणं आवश्यक आहे.

ऑफिसर स्केल II (IT) – इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

Officer Scale II (General Banking Officer) – बॅचलर डिग्री. बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

Officer Scale III – diploma in Banking, Finance, Marketing, Agriculture आणि बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क किती

खुल्या प्रवर्गासाठी – 850/- रुपये

SC/ST/PWBD प्रवर्गासाठी – 175/- रुपये

कोणती कागदपत्रं आवश्यक?

Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 27 जून 2022

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -