घरताज्या घडामोडीICSE Result 2022 : आयसीएसई दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

ICSE Result 2022 : आयसीएसई दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

Subscribe

काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशनकडून दहावीच्या दुसऱ्या वार्षिक सत्राची परीक्षा 25 एप्रिल 2022 पासून 23 मे 2022 या काळात झाली होती.

काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) कडून आयसीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रविवार ,17 जुलै 2022 म्हणजेच आज ऑनलाइन पद्धतीने संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर करण्यात येईल. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचा क्रमांक टाकून हा निकाल पाहू शकतील. याशिवाय ते आपलं मार्कशीट सुद्धा डाऊनलोड करू शकतील.

काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशनकडून दहावीच्या दुसऱ्या वार्षिक सत्राची परीक्षा 25 एप्रिल 2022 पासून 23 मे 2022 या काळात झाली होती. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे या सत्राचं आयोजन दोन भागात करण्यात आलं होतं. ही परीक्षा देशातील विविध ठिकाणी निर्धारित केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.

- Advertisement -

ICSE Result 2022: या अधिकृत वेबसाईटवरून पाहू शकता निकाल

ICSE Result 2022 : कसा पाहाल निकाल?

  • सर्वात आधी cisce.org किंवा results.cisce.org यांपैकी एका अधिकृत वेबसाईटवर जा.
  • आता होमपेज दिसेल यावर ठिकाणी आयसीएसई संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • आता तुम्ही एका नव्या पेजवर याल.
  • इथे तुम्ही तुमचा अनुक्रमांक, आईडी तसेच विचारलेली माहिती सबमीट करा.
  • आता तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -