घरमुंबईBest Strike Live : बेस्टच्या खासगीकरणाला विरोध

Best Strike Live : बेस्टच्या खासगीकरणाला विरोध

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता या संपात बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंब देखील उतरले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली असून माझ्याकडे आलात प्रश्न सुटणार असे आश्वासन राज ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला दिले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मंत्री सुभाष देसाई, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, आयुक्त अजोय मेहता, बेस्ट संयुक्त कृति समितिचे शशांक राव आणि कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत उपस्थिती होते. मात्र शंशाक राव यांनी सांगितले की, कोणत्याही राजकीय पक्षाच्या बैठकीला आम्ही आलेलो नाही. महापौर यांनी आम्हाला निमंत्रण दिले आहे. ते मुंबईचे प्रथम नागरिक आहेत. त्यांचा मान ठेवत आम्ही बैठकीला आलो आहोत. बेस्ट कामगार सेना संपात सहभागी नसल्याने त्यांना बैठकीत बोलवू नये, अशी मागणी शशांक राव यांनी केली. शशांक राव यांच्या मागणीनंतर उद्धव ठाकरे यांना आपल्याच पक्षाच्या बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर काढावे लागले.

आता सध्या उद्धव ठाकरे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त आणि बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत कृती समितीची बैठक सुरू आहेत. या बैठकीत बेस्ट बसचे खासगीकरणाबाबत चर्चा सुरू आहे, मात्र बेस्ट खासगीकरणला कृती समितीचा विरोध असल्यामुळे, बोलणी फिस्कटण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

- Advertisement -

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ४ वाजता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत


बेस्टच्या कृती समितिची बैठक संपन्न. बैठकीत अद्याप कोणताही निर्णय नाही

- Advertisement -

रेल्वे तोट्यात असल्यास ती पण बंद करणार का? राज ठाकरे यांनी उपस्थित केला सवाल


माझ्याकडे आलात प्रश्न सुटणार राज ठाकरे यांचे आश्वासन; लवकरच भूमिका जाहीर करणार


बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन घेतली भेट


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही संप चालू ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनी सांगितले आहे.


कामगार घेणार राज ठाकरेंची भेट

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बेस्ट कामगारांची भेट घेणार आहे. कृष्णकुंजवर आज बेस्ट कामगार राज ठाकरेंची भेट घेऊन आपला मुद्दा मांडणार आहेत. त्यामुळे आता बेस्ट संप चिघळणार असून राज ठाकरे यात लक्ष घालणार आहेत.


बेस्ट संपात उद्धव ठाकरे लक्ष घालणार

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्याहून परतल्यानंतर बेस्ट संपात उद्धव ठाकरेंनी उडी मारली आहे. सलग तीन दिवस सुरु असलेल्या बेस्ट संपामध्ये उद्धव ठाकरेंनी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे, महापौर, बेस्ट समिती अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.


कामगार संघटनेची बैठक

बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत कामगार संघटनेची बैठक होणार आहे. या बैठकीत काही तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान, संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बेस्ट वसाहतीतील घरं खाली करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने संप आणखी चिघळणार आहे. तसेच बेस्टचे कर्मचारी संपावर ठाम असून जोवर मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोवर संप सुरुच राहणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट भवनला कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.


गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या बसच्या संपामुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले आहेत. अद्यापही बेस्टचा संप सुरूच आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा बेमुदत संप असल्यामुळे तिसऱ्या दिवशी देखील मुंबईतील सर्व डेपोंमधून एकही बस बाहेर पडलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -