घरदेश-विदेशराफेल करारावर पंतप्रधानांनी बोलावं - राहुल गांधी

राफेल करारावर पंतप्रधानांनी बोलावं – राहुल गांधी

Subscribe

हिम्मत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याशी १५ मिनिटं चर्चा करावी आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत टिका केली आहे. हिम्मत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याशी १५ मिनिटं चर्चा करावी आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लोकसभेमध्ये जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींनी राफेल करारावरील चर्चेचं खुलं आव्हान दिलं आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत राफेल कराराबाबत सरकारची बाजु मांडली. पण, मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर सीतारमण यांना देता आलं नाही. राफेल विमानांची संख्या १२६ वरून ३६ केली गेली. याबाबत वायु दलाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं गेलं होतं की नाही? असा सवाल देखील राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, ‘एचएएल’बाबत देखील संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी खोटी माहिती दिली असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यापूर्वी देखील लाहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याशी राफेल करारावर चर्चा करावी. शिवाय, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आव्हान दिलं होतं.

वाचा – Rafale deal : सत्तेत आल्यानंतर राफेल कराराची चौकशी – राहुल गांधी

राफेल करारावरून दिवसेंदिवस देशातील राजकारण तापत असून काँग्रेसनं पैसा न मिळाल्यानं राफेल डील रोखल्याचा आरोप भाजपनं केला आहे. लोकसभेतील चर्चेदरम्यान राफेल कराराच्या मुद्यावरून विमानं देखील उडवली गेली होती. तसेच AA अंबानी आणि Q क्वात्रोची अशा घोषणा देखील दिल्या गेल्या होत्या. तर, दुसरीकडे बोफर्समुळे काँग्रेसची सत्ता गेली. पण, राफेल करार भाजप निवडणुका जिंकून देईल अशा शब्दात संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं होतं.

वाचा – राफेलबाबत धक्कादायक माहिती समोर

वाचा – Rafale deal : ‘९ टक्के स्वस्त दरानं राफेल खरेदी’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -