घरदेश-विदेशसोमालियामध्ये सिटी पोर्ट हॉटेलवर दहशतवादी हल्ला, आत्मघाती कारच्या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू

सोमालियामध्ये सिटी पोर्ट हॉटेलवर दहशतवादी हल्ला, आत्मघाती कारच्या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू

Subscribe

मोगादिशु – सोमालियाच्या किसमायो शहरातील पोर्ट सिटी हॉटेलवर इस्लामिक अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात नऊ जण ठार झाले आहेत. रविवारी आत्मघातकी बॉम्बस्फोटाने हल्ला सुरू झाला. बंदुकधारी अतिरेकी हॉटेलमध्ये जबरदस्तीने घुसले आणि सुरक्षा दलांवर त्यांनी गोळीबार केला. इस्लामिक अतिरेकी गट अल-शबाबने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांचे सैनिक तवकल हॉटेलमध्ये घुसले.

हेही वाचा – मालगाडीचे २० डबे घसरले; नागपूर-मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत

- Advertisement -

दहशतवादी हल्ल्यानंतर दक्षिण सोमाली राज्य जुबालँडमधील सुरक्षा दलांनी हल्लेखोराला वेढा घातला. तसंच, सुरक्षा दलांनी गोळीबारही केला. या गोळीबारात बंदुकधारी ठार झाले असून अनेकांची सुटका करण्यात आली आहे. परंतु किसमायो रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना नऊ मृतदेह सापडले असून त्यापैकी चार सुरक्षा कर्मचारी आहेत. तर, या हल्ल्यात 47 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पत्रकारांना हल्ल्याच्या ठिकाणाजवळ जाण्यापासून रोखण्यात आले होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फुटेजमध्ये रुग्णवाहिका जखमींना सेंट्रल किसमेत्यो येथील हॉटेलच्या बाहेरून घेऊन जाताना दिसत आहे. हे सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून अंदाजे 500 किलोमीटर (310 मैल) अंतरावर आहे. पोलीस अधिकारी अबशीर उमर यांनी फोनवर सांगितले की, आत्मघातकी हल्लेखोराच्या कारने हॉटेलच्या प्रवेशद्वाराला धडक दिली, त्यानंतर हा हल्ला झाला आणि त्यानंतर स्फोट झाला. रस्त्यालगतचे अनेक छोटे व्यवसाय उद्ध्वस्त झाले.

- Advertisement -

हेही वाचा – बंगालच्या सागरात धडकणार ‘सीतरंग’ चक्रीवादळ; IMD चा ‘या’ राज्यांना इशारा

हे हॉटेल सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. जुबालँडचे सर्वात मोठे शहर आणि व्यावसायिक राजधानी किसमायोच्या आसपासच्या भागात अल-शबाबचे मजबूत अस्तित्व असल्याचे मानले जाते. अल-कायदाशी संबंध असलेला अल-शबाब हा हॉर्न ऑफ आफ्रिका देशात नियमितपणे हल्ले करत असतो. या गटाने लोकप्रिय हॉटेल्सना नेहमी लक्ष्य केले आहे. अल-शबाबने नेहमीच मोगादिशूमधील संघीय सरकारला विरोध केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -