घरमहाराष्ट्रनागपूरमालगाडीचे २० डबे घसरले; नागपूर-मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत

मालगाडीचे २० डबे घसरले; नागपूर-मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत

Subscribe

नागपूर – ऐन दिवाळीच्या धामधुमीत लांब पल्ल्याच्या गाड्या विस्कळीत झाल्या आहेत. वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे २० डबे घसरल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. रात्री ११ वाजून २० मिनिटांनी मालखेड टीमटाला स्थानकादरम्यान ही घटना घडली. त्यामुळे दिवाळी सणानिमित्त बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

कोळसा घेऊन जाणारी मालगाडी रविवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी वर्धा आणि बडनेरा दरम्यान रुळावरून घसरली. यामुळे नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवल्या आहेत, तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

शनिवार, रविवार आणि आज लक्ष्मीपूजन असे लागून सुट्ट्या मिळाल्याने अनेकजण प्रवासाला निघाले आहेत. दिवाळी आणि प्रवासाचा उत्साह ताजा असतानाच ही दुर्घटना घडल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक गाड्या पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेमुळे नागपूर मुंबई मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -