घरमहाराष्ट्रदगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच 50 आमदार फुटले का?, केसरकरांचा ठाकरेंना प्रतिप्रश्न

दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच 50 आमदार फुटले का?, केसरकरांचा ठाकरेंना प्रतिप्रश्न

Subscribe

मुंबई – दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच 50 आमदार फुटले का? दगडाला त्यावेळी पाझर फुटला असता तर सध्या भेटी जरी दिल्या असत्या, लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली असती, लोकांना न्याय दिला असता, तर पक्षांमध्ये बंड का झालं असतं? मग पाझर कोणाला फुटत नाही, असा प्रतिप्रश्न शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी काल शिंदे गटावर टीका केली होती. त्या टीकेला केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शेतकरी म्हणून एक व्हा. आसूड माझ्याकडे नाही, तुमच्याकडेच ठेवा. तो वापरा. शेतकऱ्यांच्याच हातात आसूड शोभून दिसतो. शेतीच्या अवजारांनी तुम्ही मातीलही कोंब फोडता मग सरकारला पाझर का नाही फोडू शकत. पाझरच नाही तर घाम फोडला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावरून दीपक केसरकरांनी काल माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंवर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – सरकार उत्सवमग्न, त्यांच्याकडे भावनांचा दुष्काळ; उद्धव ठाकरेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी किती लोकांना त्यांनी 50 हजार रुपये नुकसान भरपाई दिली हे जाहीर करावं. तुम्ही जेवढे दिले त्याच्या दुप्पट आम्ही कमी वेळात पैसे शेतकऱ्यांना दिले. तुम्ही फक्त बोलता आम्ही करून दाखवतो अशी टीकाही केसरकरांनी केली. निर्दयी सरकार कसं असतं हे यापूर्वीच्या सरकारकडे बघून लोकांना समजलं आहे. आयुष्यात यांनी कधीही पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना थेट दिले नाहीत, असंही केसरकर म्हणाले.

- Advertisement -

लोकांमध्ये जाऊन लोकांना भडकवून केव्हा सरकार चालत नसतं, ज्यांना शेतकऱ्यांची आठवण अडीच वर्षांपूर्वी झाली नाही. हे घरातून बाहेर पडले नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करणे योग्य नाही. आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून दिवाळीचा शिधा प्रत्येकाच्या घरी गेला. अडीच वर्षाच्या काळात तुम्हाला ते का जमलं नाही. अडीच वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या दारावर कधी जाऊ शकले नाहीत. मात्र आज शेतकऱ्यांच्या दारावर गेले याचा मला आनंद आहे. आम्ही उठाव केल्यानंतर यांना शेतकऱ्यांची आठवण झाली. ही खूप मोठी गोष्ट आहे. उद्धव ठाकरे यांना आज शेतकऱ्यांकडे जाण्याची संधी मिळाली ती सुद्धा आमच्यामुळेच मिळाली, असा थेट हल्लाबोल दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -