घरताज्या घडामोडीतेलंगणामध्ये एका अल्पवयीन मुलाने चक्क फुटपाथवरच चढवली कार ; 4 महिलांना चिरडले

तेलंगणामध्ये एका अल्पवयीन मुलाने चक्क फुटपाथवरच चढवली कार ; 4 महिलांना चिरडले

Subscribe

तेलंगणामधील फुटपाथवरील महिलांना कारने चिरडल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणातील करीमनगरमध्ये रविवारी सकाळी फूटपाथवर बसलेल्या काही महिलांना कारने धडक दिली, त्यात चार महिलांचा मृत्यू झाला आहे . ही कार अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचा आरोप आहे. सकाळी 6.50 च्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

तेलंगणामधील फुटपाथवरील महिलांना कारने चिरडल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणातील करीमनगरमध्ये रविवारी सकाळी फूटपाथवर बसलेल्या काही महिलांना कारने धडक दिली, त्यात चार महिलांचा मृत्यू झाला आहे . ही कार अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचा आरोप आहे. सकाळी 6.50 च्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरात दाट धुक्यामुळे डोळे चोळत असताना बसचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरवर जाऊन आदळली आणि फुटपाथवर बसलेल्या लोकांना धडकली.

- Advertisement -

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत तीन महिला आणि एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला तर इतर दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तेलंगणा करीमनगर पोलीस आयुक्त व्ही सत्यनारायण यांनी सांगितले की, कायद्याचे उल्लंघन करणार्‍या अल्पवयीन मुलाने ब्रेकऐवजी एक्सीलरेटर दाबला आणि चार महिला आणि इतरांना कारने धडक दिली. किशोर हा नववीचा विद्यार्थी असून ही घटना घडली तेव्हा कारमध्ये त्याचे दोन अल्पवयीन मित्र होते. घटनेनंतर तिघे अल्पवयीन मुलांनी कार सोडून घटनास्थळावरून पलायन केले.

पोलिसांनी सांगितले की या तिघांना नंतर पकडण्यात आले आणि कारचा मालक, ज्याने आपल्या अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिली, त्यालाही ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी ही कार क्रेनच्या साहाय्याने काढली आहे. याप्रकरणी कलन 304 अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – कानपुरात दारू प्यायलेला बसचालक अनेक गाड्यांना चिरडून झाला फरार ; 6 जण जागीच ठार


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -