घरदेश-विदेशबापरे... कॅमेऱ्याचा अ‍ॅंगल पसंत न आल्याने, व्हिडिओग्राफरची हत्या

बापरे… कॅमेऱ्याचा अ‍ॅंगल पसंत न आल्याने, व्हिडिओग्राफरची हत्या

Subscribe

एका लग्नामध्ये व्हिडीओशूटींगचा अँगल पसंत नसल्याने झालेल्या वादात व्हिडीओग्राफी टीममधील एक सदस्याची हत्या करण्यात आली आहे.

दारूच्या नशेत माणूस काय करेल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रक्रार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. एका लग्नामध्ये व्हिडिओशूटींगचा अँगल पसंत न आल्याने, झालेल्या वादात व्हिडिओग्राफी टीममधील एका सदस्याची हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील फिरोझाबादमध्ये लग्न सोहळ्यात नशेमध्ये धुंद असलेल्या एका व्यक्तीने व्हिडिओ शूटींग करणाऱ्या तरुणाची गोळया झाडून हत्या केली आहे. खैरगध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दारीगपूर गावामध्ये लग्नाची वरात सुरु असताना ही घटना घडली आहे.

बॅरल शॉटगनमधून झाडल्या गोळ्या 

दिनेश कुमार, रोहित कुमार आणि सत्येंद्र कुमार हे खुर्चीवरुन लग्नाच्या वरातीचे शूटींग करत होते. अचानक यादव आणि कुलदीपने व्हिडिओग्राफी करणाऱ्या तिघांबरोबर वाद घालायला सुरुवात केली. शूटींगचा अ‍ॅंगल त्यांना पसंत नव्हता, त्यावरुन त्यांनी वाद घातला. नशेत तर्रर्र असलेला संत्येद्र यादवने त्याच्या जवळील बॅरल शॉटगनमधून व्हिडिओग्राफी करणाऱ्या टीमवर गोळ्या झाडल्या. सुरवातीला कोणालाच काही कळले नाही. मात्र गोळीबारात दोन जण जखमी झाले, तर मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु झाला. दुसऱ्या जखमीला तातडीने रूग्णालयात दाखल केले असून प्रथमोपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल

रोहित कुमार (२०) असे ठार झालेल्या व्हिडिओग्राफरचे नाव आहे. गोळीबारानंतर सत्येंद्र यादव आणि कुलदीप दोघेही घटनास्थळावरुन फरार झाले. रोहितचे नातेवाईक सुरेश चंद्रा यांच्या तक्रारीवरुन सत्येंद्र आणि कुलदीप दोघांविरोधात कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -