घरताज्या घडामोडीIncome Tax Portal : इन्फोसिसच्या सीईओंना अर्थमंत्रालयाचे समन्स

Income Tax Portal : इन्फोसिसच्या सीईओंना अर्थमंत्रालयाचे समन्स

Subscribe

इन्फोसिसने ई फाइलिंगच्या नवीन पोर्टलचे डिझाइनिंग केले होते. ७ जून रोजी पोर्टल लाँच केल्यानंतर त्यात अनेक समस्या येत होत्या.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने टेक्नोलॉजी कंपनी इन्फोसिसच्या सीईओ (nfosys CEO)  आणि एमडी सलील पारेख (Salil Parekh)  यांना समन्स बजावले आहे. सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना नवीन ई फाइलिंग पोर्टल लाँच झाल्यानंतर अडीच महिन्यानंतर त्यातील कोणत्याही समस्या दूर झाल्या नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी बोलावण्यात आले. इनकम टॅक्स इंडियाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना २३ ऑगस्ट रोजी समन्स बजावण्यात आले आहे. (Income Tax Portal: Finance Ministry summons Infosys CEO Salil Parekh)

इन्फोसिसने ई फाइलिंगच्या नवीन पोर्टलचे डिझाइनिंग केले होते. ७ जून रोजी पोर्टल लाँच केल्यानंतर त्यात अनेक समस्या येत होत्या. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट्स ट्विटर देखील त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत ट्विट करत होते. प्रोफाइल किंवा पासवर्ड बदलणे यांसारख्या साध्या गोष्टीसाठी देखील त्यांना अडचणी येत होत्या. पोर्टलवर येणारे अडथळे लवकरच दूर करुन पोर्टल व्यवस्थित काम करेल असा दावा इन्फोसिसकडून करण्यात आला होता. मात्र अनेक महिन्यांनंतरही पोर्टलवरच्या अडचणी दूर झाल्या नाहीत. त्यामुळे इन्फोसिसच्या सीईओ आणि एमडी सलील पारेख यांना केंद्रीय वित्तमंत्रालयाकडून समन्स पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

ई फाइलिंग पोर्टलबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण जून महिन्यापासून चिंतेत होत्या. इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांशी देखील याबाबत अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. त्याच्यासोबत तत्कालीन अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकुर,राजस्व सचिव तरुण बजाज आणि अर्थ मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा – अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! कोरोना काळात नोकरी गमावलेल्या ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार २०२२ पर्यंत PF

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -