घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: युक्रेन युद्धात अमेरिकेचा मोठा दावा, भारताने रशियासोबतचा लष्करी करार केला...

Russia-Ukraine War: युक्रेन युद्धात अमेरिकेचा मोठा दावा, भारताने रशियासोबतचा लष्करी करार केला रद्द?

Subscribe

'भारताने गेल्या काही आठवड्यात रशियाला दिलेल्या मिग-२९ (फायटर जेट), रशियन हेलिकॉप्टर आणि रणगाडाविरोधी शस्त्रांच्या ऑर्डर्स रद्द केल्या आहेत,' असे अमेरिकेचे अधिकारी डोनाल्ड लू म्हणाले.

रशिया आणि युक्रेन युद्धा दरम्यान भारताच्या तटस्थ भूमिकेबाबत अमेरिकेच्या खासदारांमध्ये भारताबद्दल संताप दिसत आहे. काही अमेरिकन खासदारांनी संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधातील प्रस्तावाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान भारताच्या गैरहजेरीबद्दल म्हटले की, ‘भारताने रशियासोबत असलेल्या आपल्या संबंधांबाबत दूर राहिले पाहिजे.’ तर अमेरिकेच्या सिनेटने दावा केला की, ‘भारताने रशियासोबतचा मोठा लष्करी करार रद्द केला आहे.’

रशियासोबतच्या लष्करी करार रद्द?

अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धक्कादायक दावा करत सांगितले की, ‘भारताने अलीकडे रशियन लष्करी उपकरणांच्या अनेक ऑर्डर रद्द केल्या आहेत.’ दक्षिण आणि मध्य आशियाचे सहाय्यक परराष्ट्र सचिव डोनाल्ड लू यांनी बुधवारी सिनेटच्या परराष्ट्र संबंध उपसमितीच्या सदस्यांना सांगितले की, ‘भारत हा अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे आणि भारतावर निर्बंध लादायचे की नाही? हे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ठरवायचे आहे.’

- Advertisement -

अमेरिकेचे अधिकारी डोनाल्ड लू यांनी पुढे सांगितले की, ‘भारताने गेल्या काही आठवड्यात रशियाला दिलेल्या मिग-२९ (फायटर जेट), रशियन हेलिकॉप्टर आणि रणगाडाविरोधी शस्त्रांच्या ऑर्डर्स रद्द केल्या आहेत.’

भारतावर अमेरिका लावेल निर्बंध?

काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स अॅक्ट (CAATSA) भारताला रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध लादण्यास प्रवृत्त करेल का? या प्रश्नाच्या उत्तरात अमेरिकेचे अधिकारी डोनाल्ड लू म्हणाले की, ‘दुर्दैवाने, सवलतीच्या मुद्द्यावर किंवा निर्बंधांच्या मुद्द्यावर राष्ट्राध्यक्षांचे निर्णय किंवा त्या निर्णयांवर रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा परिणाम काय आहे हे मी सांगू शकत नाही. बायडेन प्रशासनाने अद्याप CAATSA अंतर्गत भारतावर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतलेला नाही. भारताने गेल्या काही आठवड्यांपासून रशियाला मिग-२९ (फायटर जेट), रशियन हेलिकॉप्टर आणि अँटी-टँक शस्त्रास्त्रांचा ऑर्डर्स रद्द केल्या आहेत.’

- Advertisement -

हेही वाचा – Operation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्या 600 भारतीयांची एका रात्रीत सुटका; पुढील दोन दिवसात 7 हजार भारतीयांना मायदेशी आणणार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -