घरताज्या घडामोडीOperation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्या 600 भारतीयांची एका रात्रीत सुटका; पुढील दोन दिवसात...

Operation Ganga: युक्रेनमध्ये अडकलेल्या 600 भारतीयांची एका रात्रीत सुटका; पुढील दोन दिवसात 7 हजार भारतीयांना मायदेशी आणणार

Subscribe

युक्रेनमध्ये अडकलेल्या २१० विद्यार्थ्यांना शुक्रवारी सकाळी एअरफोर्सच्या दोन C-17 विमानातून मायदेशी परत आणले. ही दोन्ही विमान नवी दिल्लीच्या जवळील हिंडन एअरबेसवर उतरली. या दोन्ही विमानांनी विद्यार्थ्यांना घेऊन रोमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगरीची राजधानी बुडापेस्टवरून उड्डाण घेतले होते. केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याशिवाय एअरलाईन्स कंपनी इंडिगोच्या एक विशेश विमानाने २१९ भारत नवीन दिल्ली एअरपोर्टवर उतरले. इंडिगोचे हे विमान गुरुवारी बुखारेस्टमध्ये गेले होते. येथे केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी आणि नीतीश प्रमाणिक यांनी विद्यार्थी देशात परतल्यावर स्वागत केले. याव्यतिरिक्त एअर इंडियाचे एक विमान शुक्रवारी युक्रेनहून १८५ भारतीय घेऊन मायदेशी परतले. अशाप्रकारे एका रात्रीत ६०० भारतीयांना ऑपरेशन गंगाद्वारे भारतात आणले.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पुढील दोन दिवसांत विशेष विमानाने ७ हजार ४०० भारतीयांना परत आणण्याची आशा आहे. भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर करण्यासाठी युक्रेनच्या सीमे लगत असलेल्या देशांमध्ये चार मंत्र्यांना पाठवले आहेत, जेणेकरून भारतीयांना मायदेशी आणण्यास मदत मिळू शकेल. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी हंगरी, ज्योतिरादित्य सिंधिया रोमानिया आणि मोल्दोवा, किरेन रिजिजू स्लोवाकिया आणि जनरल (निवृत्त) वीके सिंह पोलंडमध्ये आहेत.

- Advertisement -

वीके सिंह म्हणाले की, किवहून येणाऱ्या एका विद्यार्थ्यांला गोळी लागली आहे आणि त्याला मधूनच परत किवला घेऊन गेले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत १ हजार ६०० ते १ हजार ७०० भारतीयांना मायदेशात आणले आहे.


हेही वाचा – रशियाचा 6 तासांसाठी युद्धविराम !

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -