घरताज्या घडामोडी...म्हणून चीनविरोधात बोलतायत; लष्कर प्रमुख नरवणेंच्या विधानावर चीनची आगपाखड

…म्हणून चीनविरोधात बोलतायत; लष्कर प्रमुख नरवणेंच्या विधानावर चीनची आगपाखड

Subscribe

भारतीय सेनेला आपला अहंकार गमवायचा नाही. यामुळे चीन-भारत सीमा मुद्द्यांवर नरवणेंकडून वक्तव्य करण्यात येत आहे. देशातील मुद्द्यांवरुन नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी नरवणे चीनवर टीका करत असतात.

भारताचे संरक्षण दल प्रमुख एम एम नरवणे चीनविरोधात वक्तव्य करत असतात. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्रातून नरवणेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे. चीनने मुखपत्रातून एक प्रकारे नरवणेंविरोधात संताप व्यक्त केला आहे. संरक्षण दल प्रमुख नरवणे भारतातील स्थानिक विषयांवरुन नागरिकांचे लक्ष हटवण्यासाठी चीनविरोधात वक्तव्य करत असल्याचा आरोप चीनने मुखपत्र ग्लोबल टाईम्समधून केला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर जनरल एम एम नरवणेंना काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत चीनविरोधात वक्तव्य करत होते. त्यामुळे आताचे संरक्षण दल प्रमुख नरवणेसुद्धा त्यांच्याप्रमाणेच वक्तव्य करत आहेत. कारण त्यांची बाजू मजबूत होईल. ग्लोबल टाईम्समध्ये चाइना इंस्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये एशिया- पॅसिफिक स्टडीजचे विभाग अध्यक्ष लैन जियानक्स्यू यांनी एक लेख लिहिला आहे. यामध्ये एम.एम. नरवणेंचे विधान कमांडर स्तरावर झालेल्या बैठकीनुसार सकारात्मक नव्हते.

- Advertisement -

नरवणे काय म्हणाले होते?

संरक्षण दल प्रमुख एमएम नरवणे यांनी आर्मी डेच्या दिवशी संबोधित करता चीनला स्पष्ट इशारा दिला होता. भारत चीनच्या प्रत्येक प्रयत्नाला उत्तर देईल त्यांचे प्रयत्न सफल होऊन देणार नाही. तर यापूर्वी चीनचा धोका असल्याचे सांगितले होते.

चीनचा नरवणेंवर पलटवार

संरक्षण दल प्रमुख एमएम नरवणे यांनी चीनविरोधात केलेल्या वक्तव्यावर चीनच्या सत्ताधारी पार्टीने प्रत्युत्तर दिलं आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्समध्ये म्हटलं आहे की, एमएम नरवणे यांनी भारतीय सैन्यात चीनविरोधात वक्तव्य केलं आहे. दिवंगत संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सुद्धा चीनपासून सर्वात मोठा धोका असल्याचे वक्तव्य केले होते. रावत यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधात तणाव निर्माण झाला होता. रावत यांच्या मृत्यूनंतर नरवणेंनी पदभार स्वीकारला आहे. परंतु त्यांच्यासारखेच वक्तव्य करुन स्वतःला सिद्ध करताना दिसत आहेत.

- Advertisement -

भारतीय सेनेला आपला अहंकार गमवायचा नाही. यामुळे चीन-भारत सीमा मुद्द्यांवर नरवणेंकडून वक्तव्य करण्यात येत आहे. देशातील मुद्द्यांवरुन नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी नरवणे चीनवर टीका करत असतात. भारतात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. या लाटेशी सामना करण्यासाठी भारत सक्षम नाही.


हेही वाचा : ‘Corona’ चा लवकरच अंत होणार; अमेरिकी शास्त्रज्ञांनी बुद्धिबळाचे उदाहरण देत केला दावा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -