घरदेश-विदेशचीनची नवी खेळी; भूतानलगतच्या सीमेवरही केला दावा

चीनची नवी खेळी; भूतानलगतच्या सीमेवरही केला दावा

Subscribe

लडाखच्या सीमेवर चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता चीन भूतानच्या सीमेलगतच्या जागेवरही दावा करत आहे. या आठवड्यात भूतानसोबत पूर्व सीमेवर चीनने दावा केल्यामुळे दिल्लीत खळबळ मारली आहे. बीजिंगने दावा जागतिक पर्यावरण सुविधा (जीईएफ) च्या एका ऑनलाईन बैठकतील केला आहे. यामध्ये पूर्व भूतानमधील ताशीगांग जिल्ह्यातील सकटेंग वन्यजीव अभयारण्याचा विकास करण्यासाठी आलेल्या निवेदनावर आक्षेप घेताना त्यांनी हा दावा केला.

भूतानने चीनच्या या दाव्यावर आक्षेप दर्शवला आहे. तसेच जीईएफ परिषदेने या योजनेकरता निधी मंजून केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीईएफे चीनचा दावा फेटाळला आहे. या दरम्यान दोन्ही बाजूंमधील मतभेद स्पष्टपणे पाहायला मिळाले. यावेळी भूतानचे प्रतिनिधीत्व जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक अपर्णा सुब्रमणी करत होत्या. आयएएस अधिकारी अपर्णा यांनी १ सप्टेंबर २०१७ रोजी बांग्लादेश, भूटान, भारत आणि श्रीलंका या देशांचेही प्रतिनिधीत्व केले आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यात लडाख येथील गलवानच्या खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. यावेळी भारताचे २० जवान शहीद झाले होते. दरम्यान, चीन आपले सैन्य लडाखच्या दिशेने पुढे सरकवत असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यातच आता चीन भूतानच्या सीमेवरही दावा करत असल्याचे या परिषदेत पाहायला मिळाले.

हेही वाचा –

भारताचं पहिलं सोशल मीडिया App झाले लाँच; जाणून घ्या याचे फिचर्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -