घरदेश-विदेशचीनी हल्ला पूर्वनियोजित, सरकार झोपेत होतं; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

चीनी हल्ला पूर्वनियोजित, सरकार झोपेत होतं; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Subscribe

याची किंमत आमच्या शहीद सैनिकांना मोजावी लागली

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी गलवान खोऱ्यातील घटनेवरून आज सलग दुसऱ्या दिवशीही मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. आता तर स्फटिकासारखं स्पष्ट आहे की गलवान खोऱ्यात चीनने केलाला हल्ला हा पूर्वनियोजित होता. चीन नियोजन करत असताना केंद्रातील सरकार झोपेत होतं असं राहुल गांधी म्हणाले. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या विधानावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “हे अगदी स्पष्ट झालं आहे की गलवान खोऱ्यामध्ये झालेला चिनी हल्ला पूर्व नियोजित होता. सरकार झोपेत होतं. त्याची किंमत आमच्या शहीद सैनिकांना मोजावी लागली,” असं ट्विट करत सरकारला लक्ष्य केलं आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ट्विट करत केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडत आहेत. कालही त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत, शस्त्राविना जवानांना का पाठवलं? याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला होता. राहुल गांधींच्या प्रश्नाला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिलं. जे सत्य आहे ते समजून घेण्याची गरज आहे. सीमेवर जेवढे सैनिक तैनात असतात, त्या सर्वांकडे शस्त्रे असतात, विशेषत: चौकीवरून निघत असताना. १५ जूनला गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या सर्वच सैनिकांकडे हत्यारे होती, असं जयशंकर यांनी स्पष्ट केलं होतं.

- Advertisement -

हेही वाचा – अंबानींची वचनपूर्ती; रिलायन्स समूह झाला कर्जमुक्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -