घरताज्या घडामोडीIndia corona update: पॉझिटिव्ह बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ५० हजारांनी घट;...

India corona update: पॉझिटिव्ह बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ५० हजारांनी घट; २४ तासांत २,५५,८७४ रुग्णांची नोंद

Subscribe

सध्या देशात २२ लाख ३६ हजार ८४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात काही दिवसांपासून दैनंदिन ३ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत होती. मात्र आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ५० हजार १९०ने घट होऊन २४ तासांत २ लाख ५५ हजार ८७४ रुग्णांची नोंद झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट देखील घसरला असून १५.५१ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासांत देशात ६१४ रुग्णांचा मृत्यू झाला असून २ लाख ६७ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात २२ लाख ३६ हजार ८४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

काल, सोमवारी देशात ३ लाख ६ हजार ६४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर ४३९ रुग्णांचा मृत्यू आणि २ लाख ४३ हजार ४९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. कालच्या तुलनेत आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ५० हजार १९०ने घट झाली आणि मृत्यूच्या संख्या १७५ संख्येने वाढ झाली. तर रुग्ण बरे होण्याची संख्येत २४ हजार २५८ने वाढली. त्यामुळे जरी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे दिलासा मिळाला असला तरी कोरोना मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्यामुळे चिंता कायम आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ३ कोटी ९७ लाख ९९ हजार २०२
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ४ लाख ९० हजार ४६२
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ३ कोटी ७० लाख ७१ हजार ८९८
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – २२ लाख ३६ हजार ८४२
देशातील एकूण चाचण्यांची संख्या – ७१ कोटी ९८ लाख २ हजार ४३३
देशातील एकूण लसीकरणाची संख्या – १ अब्ज ६२ कोटी ९२ लाख ९ हजार ३०८

- Advertisement -

हेही वाचा – ओमिक्रॉन Community Transmission टप्प्यात, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावली ९ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -