घरताज्या घडामोडीIndia Corona Updates: देशात २४ तासांत ३६,४०१ नवे रुग्ण, ६० टक्के रुग्ण...

India Corona Updates: देशात २४ तासांत ३६,४०१ नवे रुग्ण, ६० टक्के रुग्ण केरळमधील

Subscribe

देशात कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे. मात्र केरळमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. दररोज देशातील ६० टक्के कोरोना केसेसची नोंद केरळमध्ये होत आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ४०१ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५३० जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ३९ हजार १५७ जण रिकव्हर झाले आहेत. तसेच ३ हजार २८६ सक्रीय रुग्ण कमी झाले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी २३ लाख २२ हजार २५८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ४९ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३ लाख ६४ हजार १२९ सक्रीय रुग्ण आहेत.

- Advertisement -

काल, बुधवारी दिवसभरात देशात ५६ लाख ३६ हजार ३३६ जणांचे कोरोना लसीकरण झाले असून आतापर्यंत देशात ५६ कोटी ६४ लाख ८८ हजार ४३३ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार, आतापर्यंत ५० कोटी ३ लाखांहून अधिक जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे. यापैकी काल दिवसभरात १८.७३ लाख कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत.

देशात सध्या केरळ राज्यात कोरोनाबाधितांची संख्या खूप झपाट्याने वाढत आहेत. दररोज ६० टक्के नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. बुधवारी, केरळमध्ये २१ हजार ४२७ नव्या रुग्णांची वाढ झाली होती आणि १७९ जणांच्या मृत्यू नोंद झाली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccine: आता लसीचा तिसरा बुस्टर डोस घ्यावा लागणार?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -