घरCORONA UPDATEठरलं! ७३ दिवसात भारतीयांना मिळणार कोरोना लस, तीही अगदी मोफत!

ठरलं! ७३ दिवसात भारतीयांना मिळणार कोरोना लस, तीही अगदी मोफत!

Subscribe

भारताची पहिली कोरोना लस कोविशिल्ड ७३ दिवसांत बाजारात उपलब्ध होईल, असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसीत केली आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडेला मुलाखत देताना हा दावा केला आहे.

भारत सरकारने आम्हाला विशेष संशोधन प्राधान्य परवाना दिला आहे. या अंतर्गत आम्ही चाचणी प्रोटोकॉलची प्रक्रिया वेगवान केली आहे जेणेकरून चाचणी ५८ दिवसात पूर्ण होईल. अशा प्रकारे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस २९ दिवसांनी दिला जाईल. चाचणीचा अंतिम डेटा दुसरा डोस दिल्यानंतर १५ दिवसांनंतर होईल. या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी ७ ते ८ महिने लागतील.

- Advertisement -

१६०० लोकांवर होणार चाचणी

सध्या १७ सेंटरमधील १६०० लोकांवर २२ ऑगस्टपासून चाचणी करण्यात येत आहे. प्रत्येक सेंटरवर १०० स्वयंसेवक आहे ही लस सीरम इंस्टिट्यूटची असणार असल्याचं समजत आहे. कंपनीने अ‍ॅस्ट्रा झेनेका नावाच्या कंपनीकडून ही लस तयार करण्याचे अधिकार विकत घेतले आहेत. जेणेकरून सीरम इंस्टीट्यूट ही लस भारत आणि जगातील इतर ९२ देशांमध्ये विकेल.

केंद्रीय सरकार राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत भारतीयांना मोफत लस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आहे. यासाठी सीरमकडून ६८ कोटी डोसची खरेदी करणार आहे. आता या लसीच्या चाचण्या यशस्वीरीत्या पुर्ण होतायत का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – अरे, आता म्हणे दाऊद पाकिस्तानमध्ये नाहीच!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -