घरCORONA UPDATECoronavirus: ३० लाखांच्या पार पोहोचला बाधितांचा आकडा; २४ तासात ६९,२३९ नवे रूग्ण

Coronavirus: ३० लाखांच्या पार पोहोचला बाधितांचा आकडा; २४ तासात ६९,२३९ नवे रूग्ण

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सतत होत आहे आणि दररोज नव नव्या कोरोना रूग्णांची नोंद केली जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना विषाणूची ६९ हजार २३९ रुग्णांची नोंद झाली असून आता देशभरात कोरोना विषाणूच्या एकूण रुग्णांची संख्या ३०लाख ४४ हजार ९४१ वर गेली आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये देशात रुग्णसंख्येची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवण्यात आली. देशात मागील २४ तासात ६९ हजार २३९ नवीन रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर २४ तासांत देशभरात ९१२ जणांचा कोरोनाच्या संसर्गानं मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे कोरोनातून बरे होणार्‍या लोकांची गतीही वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ५७ हजार ७८९ लोक कोरोनामुक्त झाले आहेत आणि आतापर्यंत एकूण २२ लाख ८० हजार ५६६ लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. देशातील कोरोना विषाणूची पुनर्प्राप्ती दर ७४.८९ टक्के आहे. परंतु सध्या देशातील एकूण कोरोना रूग्णांमध्ये ७.०७ लाखाहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

भारताने कोरोना नमुना चाचण्यांचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला असून गेल्या २४ तासांमध्ये १० लाखांहून अधिक चाचण्या केल्या गेल्या आहेत. देशभरात आत्तापर्यंत ३.४४ कोटी चाचण्या झाल्या आहेत. १६ ऑगस्ट रोजी ७.४६ लाख चाचण्या झाल्या. त्यानंतर हे प्रमाण झपाटय़ाने वाढवले गेले व पुढील ६ दिवसांमध्ये १० लाखांपर्यंत पोहोचले आहे. सध्या १५११ प्रयोगशाळा कार्यरत आहेत.


अजून दोन वर्ष तरी कोरोना काही जात नाही – WHO

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -