घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉनमुळे देशात जानेवारीमध्ये येऊ शकते तिसरी कोरोनाची लाट? - तज्ज्ञांचे...

Omicron Variant: ओमिक्रॉनमुळे देशात जानेवारीमध्ये येऊ शकते तिसरी कोरोनाची लाट? – तज्ज्ञांचे मत

Subscribe

एकाबाजूला देशासह जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा धोका वाढताना दिसत आहे. तर दुसऱ्याबाजूला विशेष तज्ज्ञ नव्या वर्षात ओमिक्रॉन व्हेरिएंट नवीन समस्या निर्माण करून तिसरी कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवत आहेत. एका टीव्ही चॅनलसोबत झालेल्या बातचित दरम्यान मेदांत रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर नरेश त्रेहन यांनी ओमिक्रॉन नव्या वर्षात नवीन समस्या असल्याबाबतची शक्यता वर्तवली आहे.

ओमिक्रॉनचा प्रसार सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झाल्याची शक्यता

देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या २५ केसेस आढळल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत गंभीर आणि सर्व कठोर पाऊल उचलत आहेत. सरकार उचलत असलेल्या पावलांना डॉक्टर नरेश त्रेहन यांनी समर्थन केले आहे. त्यांनी नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, ‘जे लस घेणारे लोकं या व्हेरिएंटचा शिकार होत आहेत, त्यांच्यामध्ये गंभीर लक्षणे दिसत नाही आहेत. पण ज्या लोकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही, त्यांच्यासाठी हा व्हेरिएंट धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर लस घ्या. बेफिकीर राहू नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण जरी नोव्हेंबरमध्ये आढळला असला तरी याची सुरुवात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झाल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पुढे डॉ. त्रेहन म्हणाले की, आपण डेल्टा व्हेरिएंटसोबत लढाई जिंकलो. लोकांनी मास्क घालायचे कमी केले, त्याच्या परिणाम दिसून आला. त्यामुळे आता तसे करण्याची गरज नाही. मास्क घालणे खूप महत्त्वाचे आहे. सरकार खबरदारी म्हणून बूस्टर डोसचा विचार करत आहेत.’ त्यांच्यामते या संकटात फ्रंटलाईनवर असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बूस्टरची नितांत गरज आहे.


हेही वाचा – Omicronचा वाढत्या अनुषंगाने राज्यात जिनोम सिक्वेंसिंगच्या लॅब वाढणार; निर्बंध पुन्हा लादले जाणार का?; काय म्हणाले टोपे?

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -