घरCORONA UPDATEIndia Corona Update: गेल्या २४ तासांत बाधितांसह मृतांमध्ये घट; ३५ हजारांहून अधिकांची...

India Corona Update: गेल्या २४ तासांत बाधितांसह मृतांमध्ये घट; ३५ हजारांहून अधिकांची कोरोनावर मात

Subscribe

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरताना दिसतोय. देशात सध्या दररोज ४० हजारांच्या आसपास नव्या बाधितांची नोंद केली जाते. सलग चौथ्या दिवशी देशात ४० हजारांहून कमी बाधितांची नोंद करण्यात आली असून देशाची चिंता कमी झाल्याचे दिसतेय. आज सोमवारी देशात ३९ हजार ३६१ इतके नवे कोरोना बाधित आढळले तर ४१६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यासह ३५ हजारांहून अधिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रविवारी करण्यात आलेल्या बाधितांच्या नोंदीपेक्षा आजच्या आकड्यात काहिशी घट झाल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३९ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले असून ४१६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३५ हजार ९६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून आतापर्यंत ३ कोटी १४ लाख ११ हजार रुग्णांना लागण झाली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २० हजार ९६७ जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ५ लाख ७९ हजार १०६ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ४ लाख ११ हजार १८९ जणांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४५ कोटी ७४ लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ११.५४ लाख कोरोना लसींचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. यासह आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २५ जुलैपर्यंत देशभरात ४३ कोटी ५१ लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात १८ लाख ९९ हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लसीचे ४५. ३७ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

- Advertisement -

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -