घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटदेशात गेल्या २४ तासांत १४ हजार नव्या रुग्णांची नोंद; ३७५ लोकांचा मृत्यू

देशात गेल्या २४ तासांत १४ हजार नव्या रुग्णांची नोंद; ३७५ लोकांचा मृत्यू

Subscribe

देशात पहिल्यांदाच २४ तासात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १४ हजारांपेक्षा जास्त वाढ

देशात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला असून गेल्या २४ तासांत १४ हजार ५१६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ३७५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात आता एकूण ३ लाख ९५ हजार ०४८ इतके कोरोनाबाधित झाले आहेत. यामध्ये १ लाख ६८ हजार २६९ अॅक्टीव्ह केसेस असून आतापर्यंत २ लाख १३ हजार ८३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासात ९ हजार १२० रुग्ण बरे झाले आहेत तर ३७५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण बळींची संख्या १२ हजार ९४८ इतकी झाली आहे.

दुसरीकडे भारताचा रिकव्हरी रेट वाढता आहे. हा रिकव्हरी रेट आता ५३.८ % हून ५४.१ % झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त रुग्ण असले तरी, एक दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ५ दिवसांपासून महाराष्ट्रातील निरोगी रुग्णांचा आकडा हा ५० % आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३ हजार ८२७ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, १ हजार ९३५ रुग्ण निरोगी झाले.

- Advertisement -

दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख २४ हजार ३३१ झाली आहे. तर, ६२ हजार ७७३ रुग्ण निरोगी झाले आहे. भारतातील एकूण २५ राज्यांमधील रिकव्हरी रेट हा ५० % जास्त आहे. सध्या केवळ १० राज्यांचा निरोगी रुग्णांची आकडेवारी ही नवीन रुग्णांपेक्षा कमी आहे.

तर ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली हे चार देश असे आहेत, जिथे ३० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा १.२१ लाखांहून अधिक झाला आहे.


लक्षण नसणाऱ्या कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असू शकते: स्टडी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -